"कोरोना'चे संकट जाऊ दे... सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे ! 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 एप्रिल 2020

"कोरोना'ने जगभरात थैमान मांडले आहे. देशही "लॉकडाऊन' असून, सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याची सूचना शासनाकडून असल्याने जैन बांधवांनी भगवान महावीर जयंती प्रत्येकाने आपल्या घरीच साजरी केली. 

जळगाव ः शहरात जैन समाजबांधवातर्फे दरवर्षी भगवान महावीर यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने सावर्जनिक पद्धतीने साजरा केला जात असतो. महावीरांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येतात. परंतु यावर्षी जगावर आलेल्या "कोरोना'च्या संकटामुळे भगवान महावीर यांची जयंती कार्यक्रम सार्वजनिक न करता तो जैन बांधवांनी आपल्या घरीच साध्या पद्धतीने करण्यात आला. यावेळी भगवान महावीरांना "कोरोना'चे संकट लवकर जाऊ दे...सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे अशी विश्‍वशांतीची प्रार्थना केली. "कोरोना'ने जगभरात थैमान मांडले आहे. देशही "लॉकडाऊन' असून, सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याची सूचना शासनाकडून असल्याने जैन बांधवांनी भगवान महावीर जयंती प्रत्येकाने आपल्या घरीच साजरी केली. 

सुमिरा गांधी परिवारातर्फे वरघोडा मिरवणूक 
जैन समाजातील सुमीर गांधी परिवारातर्फे आज भगवान महावीर जयंतीनिमित्त सार्वजनिक कार्यक्रम न घेता घरातील सदस्यांसोबत जयंती साजरी केली. यात सकाळी ध्वजवंदन, वरघोडा मिरवणूक घरातच, नवकार मंत्र, भगवान महावीर यांची आरती, भोग तसेच प्रसाद वाटप व प्रवचन तसेच भजन कार्यक्रम घरीच घरच्या सदस्यांनी एकत्र व ठराविक अंतर पाळून जयंती साजरी केली. 

"कोरोना'च्या संकटामुळे भगवान महावीर जयंती जैन बांधवांनी घरच्या घरीच साजरी केली. यात देशावर तसेच 
जगावर आज आलेल्या "कोरोना'च्या संकटातून सर्वांना बाहेर पडण्यासाठी सर्वांनी प्रार्थना केली. 
- अजय गांधी, श्री जैन युवक मंडळ माजी अध्यक्ष. 

"कोरोना'मुळे पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यासह जैन समाजाच्या धर्मगुरूंनी आम्हाला घरीच भगवान महावीर जयंती घरीच साजरी करण्याचे सांगितले आहे. त्यानुसार आम्ही विश्‍वशांतीची प्रार्थना केली आहे. 
- संजय गांधी, सदस्य, जैन श्‍वेतांबर मूर्तिपूजक संघ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Mahaveer Jubilee celebrates with 'Social Distance' bu jain society