

जळगाव ः जिल्हा मन्सुरी पिंजारी बिरादरीतर्फे सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात समाजातील तेरा जण विवाह बंधानात अडकले. खानदेश सेंट्रल परिसरात पार पडलेल्या सोहळ्यात खासदार ए. टी. नाना पाटील, माजी मंत्री सुरेशदादा जैन, हाजी गफ्फार मलिक, करीम सालार, माजी महापौर नितीन लढ्ढा, इकबाल पिरजादे, शरीफ सरदार, संतोष पाटील, अख्तर पिंजारी, गनी मेमन, असलम पिंजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात येथील जोडप्यांची उपस्थिती होती. सामुहिक विवाहाच्या निकाह पठण मौलाना जुबेर यांनी केली. त्यांच्यासोबत मौलाना इदू, मौलाना असगर हे होते.
जोडप्यांना संसारोपयोगी वस्तू
विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या 13 जोडप्यांना समाजातील नागरीक व संस्थेकडून भेट वस्तू व संसारपयोगी वस्तू देण्यात आल्या. यात कुरान शरीफ, पेटी, जानमाज, पलंग, गादी, ब्लॅंकेट, मिक्सर, इलेक्ट्रिक प्रेस, ग्लास सेट, कुकर, दुल्हन हाथघडी, घड्याळ, कपबशी सेट, लेमनसेट, हॉटपॉट, पाच लिटर वॉटर बॅग, सिलिंग फॅन, चटई, फ्राय फॅन, वधू- वरांना कपडे (कुर्ता, पायजमा, टोपी, ड्रेस, नकाब आदी) यसासारखे साहित्य देण्यात आले.
या जोडप्यांचा झाला विवाह
मन्सुरी पिंजारी समाजातील मोहसीन- रूखसार नाज, अफसर- आफरीन बी, सद्दाम हुसैन- परवीन बी, मो. इरफान- आफरीन राहत, आसीफ- अंजुम बानो, अमीन- तनुजा बी, जुबेर- करीश्मा बी, शेख मोहसीन- शहनाज बी, शकुर- अन्जुम नाज, सलमान- मुस्कान नाज, कलीम- रूखसाना, शाहरूख- तबस्सुम हे विवाह बंधनात अडकले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.