सोशल डिंस्टसला केराची टोपली...बाजार समितीत भाजीपाला लिलावासाठी गर्दी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 मार्च 2020

भाजीपाला अत्यावश्‍यक सेवेत असल्याने संपूर्ण जिल्हाभरातून भाजीपाला विक्रीसाठी आला आहे. घाऊक विक्रेत्यांसह नागरिक किरकोळ खरेदी करण्यासाठी बाजार समितीमध्येत असल्याने गर्दीमध्ये वाढ झाली. होणारी गर्दी कमी करण्यासाठी भाजीपालामार्केटमधील काही जणांना धान्य मार्केटच्या परिसरात जागा देवून त्यांची होणारी गर्दी कमी करण्याचे नियोजन करीत आहे. 
कैलास चौधरी, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती.

जळगाव: संचारबंदीच्या काळात अत्यावश्‍यक सेवा म्हणून भाजीपाला व्यवसाय देखील वगळण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोशल डिंस्टटला ढेंगा दाखवत लिलावात भाजीपाला खरेदी करण्यासाठी विक्रेत्यांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बाजार समितीमध्ये होणारी गर्दीमुळे नागरिकांसह विक्रेत्यांकडून स ंचारबंदीच्या आदेशांना केराची टोपली दाखविली जात असल्याचे चित्र आज दिसून आले. 

कोरोना व्हायरचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात 21 दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात दूध, किरणा माल, दवाखाने, औषधी विक्री, भाजीपाला या अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या आहे. जिल्हाभरातील शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणत आहे. मात्र नागरिकांसह विक्रेते भाजीपाला खरेदीसाठी सकाळीच मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याचे चित्र आज बाजार समितीमध्ये दिसून आले. त्यामुळे प्रशासनाकडून वारंवार सांगितल्या प्रमाणे गर्दी टाळण्याच्या आव्हानाला विक्रेते व नागरिकांकडून काळे फासले जात असल्याचे चित्र आज दिसून आले. 

लॉकडाऊनचा निर्णय केळव कागदावरच 
शहरात होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीसह लॉकडाऊनचे आदेश दिले आहे. सकाळच्याच सुमारास बाजार समितीमध्ये विक्रेत्यांची झुंबड उडालेली दिसून आली. कोणताही साहित्य खरेदी करतांना अंतर ठेवले पाहिजे असा सामाजिक निर्णय आहे. मात्र त्यालाही हरताळ फासण्यात आला आहे. दुसरीकडे पोलिस प्रशासनाकडून गर्दी टाळण्यासाठी कुठल्याच प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले लॉकडाऊनचे आदेश केवळ कागदावर असल्याचे दिसून येत आहे. 

बहुतांश तोंडाला मास्क नाही 
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने तोंडाला रुमाल व मास्क बांधणे आवश्‍यक आहे. मात्र भाजीपाला खरेदी व विक्री करण्यासाठी आलेल्या बहुतांश जणांच्या तोंडाला रुमाल किंवा मास्क बांधलेले नव्हते. नागरिकांकडून आपली स्वताची काळजी देखील घेतली जात नसल्याने कोरोनाचा प्रसार झपाट्याने पसरण्याची चिन्ह दिसून येत असून पुढील परिस्थिती अत्यंत भयावह असल्यचे चित्र बाजार समितीमध्ये दिसून आले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Market Committee crowds for vegetable auction Kerala Basket for Social Distns