दुकानातून साडेतीन लाखाच्या रोकडसह सीसीटीव्हीचा डिव्हीआरही लांबविला 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

जळगाव : शहरातील जुन्या जिल्हा परीषदेच्या अगदीच मागे शेरु टॉवर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर यु-झी क्रियेशन रेडीमेड गारमेंटचा छोटेखानी कारखाना आहे. अज्ञात चोरट्यांनी रात्री दिड वाजेच्या सुमारास शटर वाकवून आत प्रवेश करत तिजोरीतील 3 लाख 65 हजार रुपयांची रोकड घेवून पोबारा केल्याची घटना घडली. चोरट्यांनी यशस्वी चोरी केल्यानंतर दुकानातील सिसीटीव्ही यंत्रणेचे डिव्हीआर काढून सोबत नेला आहे. शहर पोलिस ठाण्याच्या अगदी शेजारीच ही घटना घडली असून दुसऱ्या दिवशी गुन्ह्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 

शहरातील गणपतीनगर येथील रहिवासी राम गंगुमल कटारीया (वय-46) यांचे जुन्या जिल्हापरिषद इमारतीच्या अगदी मागेच शेरु टॉवर इमारतीत तिसऱ्या मजल्यावर रेडीमेड गार्मेंटचा उद्योग आहे. यु-झी क्रियेशन या नावाने त्यांच्या कारखान्यात 18-20 कामगारांच्या माध्यमातुन रेडीमेड कोटस्‌ शेरवानी तयार करण्यात येवुन ठोक दरात विक्री केली जाते. शनिवारी संध्याकाळी नेहमी प्रमाणे कटारीया यांच्या कडे कामाला असलेल्या कारागीर मिस्तरींनी शटर लावुन दुकान बंद केले. दुसऱ्या दिवशी रविवार (ता.9) सकाळी नेहमी प्रमाणे एका शिपचे मिस्तरी-कारागीर कामासाठी आले असता, त्यांना शटर वाकवलेले दिसले, त्यांनी तत्काळ कटारीया यांना फोन करुन पाचारण केले. घटनेची माहिती शहर पोलिसांना दिल्यावर ठसेतज्ञ, डॉगस्कॉड आणि फॉरेन्सीक टिम घटनास्थळावर दाखल झाल्यात कटारीयांच्या यांच्या तिजोरीतील 3लाख 46 हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लांबवल्याचे आढळून आले असून चोरट्यांनी रक्कम मिळाल्यानंतर आतील सिसीटीव्ही यंत्रणेचे डीव्हीआर चोरुन नेल्याचे आढळून आले. घडल्या प्रकारा बाबत राम कटारीया यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्याचे कामक सुरु होते. 

शहर पोलिस झोपेतच 
शहर पोलिस ठाण्याच्या मागे जुन्या जिल्हा परिषदेत वेश्‍या व्यवसाय केला जात असल्याचे स्टींग ऑपरेशन दोन दिवसांपुर्वीच "सकाळ' प्रतिनीधी मार्फत करण्यात आले. त्याच जिल्हा परीषदेच्या मागे, आज चोरीची घटना घडली असून शेरु टॉवर येथे निवांतपणे चोरटे शटर तोडून, आतील तिजोरी फोडून साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरुन पोबारा झाले आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon market robbary shop cctv camera DVR box