कोरोनाच्या संशयीतांचे आणखी दोन बळी; अहवाल प्रलंबीत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 एप्रिल 2020

कोरोना संशयीतांचा अहवाल येण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. त्याचा अहवाल आल्यानंतर त्याचा मृत्यू मधूमेह व इतर आजारांमूळे झाला असल्याचे निष्पन्न झाले होते. कोरोनाच्या संशीतांचा जिल्ह्यातील हा तीसरा बळी ठरला आहे.

जळगाव : कोरोना सदृष्य लक्षणे जाणवत असल्याने उपचारासाठी जिल्हा वैद्यकीय रुग्णालयता उपचार घेत असलेल्या कोरोनाच्या दोन संशयीत रुग्णांचा शनिवारी रात्रीच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली. या दोघ संशयीतांचा अहवाल प्रलंबित असल्याने अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. तसेच यापूर्वी देखील एका 60 वर्षीय कोरोना संशयीतांचा अहवाल येण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. त्याचा अहवाल आल्यानंतर त्याचा मृत्यू मधूमेह व इतर आजारांमूळे झाला असल्याचे निष्पन्न झाले होते. कोरोनाच्या संशीतांचा जिल्ह्यातील हा तीसरा बळी ठरला आहे. 

जिल्ह्यात कोरोनाच्या संशयीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना सदृष्य लक्षणे जाणवत असल्याने जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झालेल्या शहरातील 33 वर्षीय युवक व 62 वर्षीय वयोवृद्धाचा शनिवारी रात्री अचानक मृत्यू झाला. दरम्यान मयत झालेल्या दोघ संशयीतांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल प्रलंबित आहे. मात्र अहवाल येण्यापूर्वीच या दोघ कोरोना संशयीतांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण प्रशाकीय यंत्रणा हादरुन गेली आहे. 

कोरोनाच्या संशयीतांचा आणखी दोन बळी 
गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना वार्डात उपचारासाठी दाखल झालेल्या 60 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाचा अहवाल येण्यापूर्वीच त्याचा अचनाक मृत्यू झाला होता. दरम्यान शनिवारी रात्रीच्या सुमारा मयत झालेल्या दोघांचे अहवाल प्रलंबित आहे. त्या दोघांना अहवाल येण्यापूर्वीच त्या दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या संशयीतांमधील हे दोघ कोरोनाचे संशयीत बळी ठरले आहे. 

जिल्हा प्रशासन हादरले 
जिल्हा वैद्यकीय रुग्णालयातील कोरोना वार्डात उपचार घेत असलेल्या दोघांचा एकाचवेळी मृत्यू झाल्याची माहिती कळताच वैद्यकीय यंत्रणेसह जिल्हा प्रशासन हादरुन गेले. यापूर्वी देखील याच वार्डात उपचार घेत असलेल्याचा मृत्यू झाला होता. एकाचवेळी दोघांचा मृत्यू झाल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon medical collage corona ditect two death late night