राज्यातील सहकारी दुध संघाना बळकटी देणार : मंत्री सुनिल केदार 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 January 2020

दुध संघाला बळकटीकरण करणे गरजेचे आहे. सर्व लहान लहान दुध विक्रेते, सोसायटया, तालुका स्तरावरील दुध संघाने एकत्रीतरित्या काम करायला पाहिजे. ते झाले तर "महानंदा' संघ "अमुल', "अमर' डेअरीच्याही पुढे जाईल. त्यासाठी शासन पाउले उचणार आहे. 

जळगाव : राज्यातील "महानंदा'मध्ये गेल्या पाच वर्षात राजकारणच झाले अधिक झाले. भाजपने महानंदाची वाट लावली. सहकारी तत्वावर चालणारा महानंदासह राज्यातील इतर दुध संघ, सोसायट्यांच्या बळकटीकरणासाठी लवकरच धोरण निश्‍चीत करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याचे दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 

क्‍लिक करा - आमदार भोळेंची सुपारी घेणारे अधिकारी आहेत तरी कोण  

मंत्री केदार यांनी सांगितले,की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या घरात दुध विक्रीतून उदरनिर्वाह चालतो. तो सक्षमपणे चालावा यासाठी त्यांच्या दुधाला चांगला भाव मिळाला पाहिजे. तो भाव मिळण्यासाठी दुध संघाला बळकटीकरण करणे गरजेचे आहे. सर्व लहान लहान दुध विक्रेते, सोसायटया, तालुका स्तरावरील दुध संघाने एकत्रीतरित्या काम करायला पाहिजे. ते झाले तर "महानंदा' संघ "अमुल', "अमर' डेअरीच्याही पुढे जाईल. त्यासाठी शासन पाउले उचणार आहे. 

ते म्हणाले,की महानंदा ही दुग्ध उत्पादन क्षेत्रात काम करणारी मातृसंस्था आहे. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी ही संस्था महत्त्वाची आहे. दुधाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नगदी उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी महानंदा एक आशेचे किरण आहे, मात्र गेल्या पाच वर्षात महानंदामध्ये केवळ राजकारणच झाले. एकनाथराव खडसे यांचे नाव न घेता केले. माजी मंत्री भाजप नेते एकनाथराव खडसे यांच्या पत्नी या महानंदाच्या चेअरमन असल्याने सुनिल केदार आहेत ना ? 

दुध संघावर कारवाई नाही 
जिल्हा दुध संघाबाबत काही तक्रार आहे का? असे यावेळी झालेल्या बैठकीत मंत्री केदार यांनी अधिकाऱ्यांना विचारले. त्यावर अधिकारी काहीच बोलले नाहीत. मंत्री केदार म्हणाले, की तक्रार असल्यातरी कारवाई करू नका. मला अगोदर विचारा. दुध संघ टिकला पाहिजे, अशी आमची भुमिका आहे. 

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर चुप्पी 
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादून लोकशाहीचा गळा घोटल्याचे आरोप केले होते. यावरून राजकारण तापले होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यावरून नाराजी देखील व्यक्त केली होती. दरम्यान याबाबत मंत्री सुनिल केदार यांना विचारण्यात आले असताना त्यांनी चुप्पी साधली. आमच्या पक्षाचे प्रवक्ते, नेते आहेत तेच आव्हाड यांच्या विधानावर भाष्य करू शकतात असे सांगून त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon minister sunil kedar press sahkari milk fedration