मुक्‍ताईनगर नगरपंचायतीवर भाजपची सत्ता 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

जळगाव ः मुक्‍ताईनगर नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुक प्रक्रियेतील मतमोजणी आज झाली. या निवडणुकीत नगरपंचायतीमध्ये झालेल्या तिरंगी लढतीत भाजपने विजय प्राप्त करत सत्ता मिळविली. मतमोजणी प्रक्रियेत 17 जागांचे निकाल जाहीर झाले असून यात 13 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले असून 1 अपक्ष आणि 3 जागा सेनेच्या आल्या आहेत. 

मुक्‍ताईनगर नगरपंचायत निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून होते. निवडणूक माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची होती. तर शिवसेना- राष्ट्रवादी आघाडी आणि कॉंग्रेससाठी अस्तित्वाची लढाई झाली. सकाळी नऊला मतमोजणी प्रक्रियेला सुरवात झाली. यात सुरवातीपासून भाजपच्या उमेदवारांची घेतलेली आघाडी कायम राहिली. नगरपंचायतीच्या 17 जागांपैकी 13 जागांवर भाजपचे वर्चस्व राखत तिरंगी लढतीत एकहाती सत्ता मिळविली. तर नगराध्यक्ष पदाकरीता भाजपचे उमेदवार नजमा तडवी हे विजयी ठरले आहे. विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता. 

Web Title: marathi news jalgaon muktainagar election bjp