मनपात नवीन सहा लिफ्ट बसणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

जळगाव ः मुख्यमंत्र्यांनी काही वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या 25 कोटींच्या निधीतून महापालिकेत सहा नवीन लिफ्ट बसविण्याचा कामाला मंजुरी मिळाली होती. त्यानुसार या कामाचे कार्यादेश मक्तेदाराला दिले असून, आज महापौर सीमा भोळे यांच्याहस्ते नवीन लिफ्ट बसविण्याच्या कामाचे उद्‌घाटन करण्यात आले. 
महापालिकेत सहा लिफ्ट असून, चार लिफ्ट अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याने त्या बंद आहेत. केवळ 
दोन लिफ्टवर काम सुरू होते. त्यात दोन लिफ्ट नादुरुस्त होत असल्याने महापालिकेत येणाऱ्या नागरिकांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. नवीन लिफ्ट कार्यान्वित करण्याचा निर्णय 

घेण्यात आला आहे. त्यानुसार 25 कोटींच्या निधीतून सहा लिफ्टची मंजुरी घेण्यात आली. आज नवीन लिफ्टच्या कामांचे उद्‌घाटन महापौरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, सभापती स्थायी समिती जितेंद्र मराठे, नगरसवेक राजेंद्र पाटील, कुलभूषण पाटील, मनोज आहुजा, चेतन सनकत, धीरज सोनवणे, विशाल त्रिपाठी, नगरसेविका ज्योती चव्हाण, उज्ज्वला बेंडाळे, पार्वताबाई भिल, आयुक्त डॉ. उदय टेकाळे, मुख्यलेखाधिकारी संतोष वाहुळे, वीज विभागप्रमुख सुशील साळुंखे तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

शिवसेनेचा बहिष्कार 
महापालिकेत नवीन सहा लिफ्ट बसविण्याच्या कामाच्या उद्‌घाटन कार्यक्रमाचा फलक व पत्रिका छापली होती. मात्र, शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांचे नाव नसल्यामुळे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार असल्याचे नगरसेवक नाईक यांनी पत्रकारांशी 
बोलताना सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon muncipal corporation 6 lift