गाळे करार नूतनीकरणामुळे "मनपा'ला कोट्यवधीचा फटका 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जानेवारी 2020

महापालिका मालकीच्या 18 व्यापारी संकुलांतील 2387 गाळ्यांची मुदत 2012 मध्ये संपली. गेल्या सात वर्षांपासून गाळेधारक अनधिकृत भोगवटाधारक असून, थकीत रकमेचा भरणा करण्यासाठी प्रशासनाने 81 "क'ची नोटीस बजावली होती. त्यानुसार काही गाळेधारकांनी प्रशासनाने वितरीत केलेल्या बिलापैकी काही रकमेचा धनादेशाद्वारे भरणा केला. आतापर्यंत सुमारे साठ कोटींचा भरणा झालेला आहे.

ळगाव : महापालिका मालकीच्या 18 व्यापारी संकुलांतील मुदत संपलेल्या गाळ्यांचा लिलाव करावा की कराराचे नूतनीकरण करावे यासंदर्भात सध्या महापालिका अधिकारी व पदाधिकारी यांच्यात चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. परंतु गाळ्यांचे नूतनीकरण झाल्यास महापालिकेला गाळ्यांतून मिळणारी प्रिमियमची रक्कम व अन्य रक्कम मिळणार नाही. त्यामुळे महापालिकेस मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्‍यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. 

हेही पहा > रेडक्रॉसने वाचविले वर्षभरात 22 हजार रूग्णांचे प्राण

महापालिका मालकीच्या 18 व्यापारी संकुलांतील 2387 गाळ्यांची मुदत 2012 मध्ये संपली. गेल्या सात वर्षांपासून गाळेधारक अनधिकृत भोगवटाधारक असून, थकीत रकमेचा भरणा करण्यासाठी प्रशासनाने 81 "क'ची नोटीस बजावली होती. त्यानुसार काही गाळेधारकांनी प्रशासनाने वितरीत केलेल्या बिलापैकी काही रकमेचा धनादेशाद्वारे भरणा केला. आतापर्यंत सुमारे साठ कोटींचा भरणा झालेला आहे. मात्र, ज्या गाळेधारकांनी एकही रुपया भरणा केलेला नाही अशांची यादी तयार करून महात्मा फुले आणि सेन्ट्रल फुले संकुलातील 42 गाळे सील करण्याची कारवाई प्रशासनाने केली. उर्वरित संकुलांतील गाळेधारकांवर कारवाई करून या गाळ्यांचा जाहीर लिलाव करावा याबाबत महापालिका प्रशासन शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार पाऊल उचले आहे. 

पदाधिकाऱ्यांचा नूतनीकरणावर भर 
परंतु महापालिकेतील पदाधिकाऱ्यांकडून गाळ्यांचा लिलाव न करता गाळेधारकांना पुन्हा गाळे देऊन 
कराराचे नूतनीकरण करावे, ही मागणी केली जात आहे. याबाबत आयुक्तांची आमदारासोबत काही पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन गाळ्यांचे नूतनीकरण करण्यावर भर दिला जात आहे. 

"मनपा'चे अधिकारी संभ्रमात 
महापालिका प्रशासनाने काही संकुलांतील गाळे सील केले आहेत. त्यानुसार गाळ्यांचा लिलाव करण्यासाठी मागील दहा दिवसांपूर्वी प्रशासनाने शासनाचे परिपत्रक, न्यायालयाने दिलेले निकाल त्यानुसार नियमानुसार गाळे लिलाव करण्याचा हालचाली सुरू केल्या होत्या. त्यानुसार पाऊल उचलून आठ ते दहा दिवसांत विशेष महासभेचे आयोजन करण्याच्या हालचाली सुरू केल्या. परंतु पदाधिकाऱ्यांच्या नूतनीकरणाचा जोर लावल्याने महापालिकेचे अधिकारी आता संभ्रमात आहेत. 

... तर कोट्यवधींचे नुकसान 
गाळे नूतनीकरण झाल्यास महापालिकेचे प्रचंड नुकसान होणार आहे. गाळे लिलाव करताना प्रत्येक गाळ्याची येणारी प्रिमियम, लिलाव बोलीतून येणारी जादा रक्कम आदी माध्यमांतून रक्कम मिळू शकते. परंतु नूतनीकरण झाल्यास प्रत्येक गाळ्याचा अंदाज पाहता महापालिकेचे सुमारे शंभर कोटींचे आर्थिक नुकसान होणार असल्याची माहिती समोर येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon muncipal corporation fule market