"स्थायी'चे सोळापैकी आठ सदस्य चिठ्ठी टाकून केले जाणार निवृत्त 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 September 2019

जळगाव : स्थायी समितीच्या 16 सदस्यांपैकी 8 सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत असून, उद्या (ता. 17) होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत चिठ्ठी टाकून या आठ सदस्यांना निवृत्त केले जाणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेकडे आता लक्ष लागून आहे. 

जळगाव : स्थायी समितीच्या 16 सदस्यांपैकी 8 सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत असून, उद्या (ता. 17) होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत चिठ्ठी टाकून या आठ सदस्यांना निवृत्त केले जाणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेकडे आता लक्ष लागून आहे. 
स्थायी समितीच्या आठ सदस्यांच्या निवृत्तीसाठी उद्या (ता 17) सकाळी अकराला सभापती जितेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा होणार आहे. गेल्यावर्षी झालेल्या निवडणुकीनंतर 11 सप्टेंबर 2018 ला या सदस्यांची निवड करण्यात आली होती. या समितीमध्ये एकूण 16 सदस्य असून, यामध्ये भाजपचे भगत बालाणी, सदाशिव ढेकळे, ऍड. सुचिता हाडा, उज्ज्वला बेंडाळे, ऍड. दिलीप पोकळे, प्रवीण कोल्हे, सुनील खडके, प्रतिभा पाटील, चेतन सनकत, सुरेश सोनवणे, मयूर कापसे, जितेंद्र मराठे हे 12 सदस्य तर शिवसेनेचे नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, नितीन बरडे हे तीन तर एमआयएमचे रियाज बागवान यांचा समावेश आहे. या 16 सदस्यांपैकी उद्या होणाऱ्या सभेत कोणत्या आठ जणांचा पत्ता कट होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

विधानसभेनंतर सभापती निवड 
स्थायी समितीमधील आठ सदस्यांची मुदत उद्या (ता.17) संपत आहे. स्थायी समितीचे सभापती जितेंद्र मराठे यांचा कार्यकाळ 30 ऑक्‍टोबरपर्यंत असून, सभापतींची निवड ही विधानसभा निवडणुकीनंतरच होणार असल्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon muncipal corporation sthai member