esakal | रस्त्यावरील बेशिस्त फळ-भाजी बाजार होणार बंद ! 
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यावरील बेशिस्त फळ-भाजी बाजार होणार बंद ! 

लॉकडॉन नंतर शहरात जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील सर्व आठवडे बाजार बंद केले आहे. तरी देखील अनेकठिकाणी हे बाजार भरत आहे.

रस्त्यावरील बेशिस्त फळ-भाजी बाजार होणार बंद ! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव ः जळगाव शहरात दिवसेंदिवस कोरोना विषांणूचे रुग्णांच्या संख्येत वाढ आहे. त्याला कारणीभूत शहरातील अनेक ठिकाणी व रस्त्यांवर भरणारे फळ-भाजी बाजार ठरत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने खबरदारी घेत रस्त्यांवरील सर्व फळ-भाजी विक्रेत्यांना रस्त्यांवर दुकाने लावण्यास बंदी घातली आहे. ज्या विक्रेत्याचे रस्त्यावर दुकान आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. तसेच मोकळ्या मैदानात ठरावीक अंतरावर नोंदणीकृत हॉकर्सला जागा देवून बाजार भरविणार आहे. 

आर्वजून पहा : भाजपचा फौजफाटा खडसेंना घेरण्याच्या तयारीत ! 

जळगाव शहरात अनेक मुख्य रस्त्यांवर लॉकडाऊनच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशावरून देखील भाजी-फळ विक्रेत्यांचे दुकाने लावले जात आहे. तेथे मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी गर्दी करत असून कोरोनाचा यामुळे शहरात संसर्ग वाढतच आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने कठोर पावले आज उपायुक्त संतोष वाहुळे, बांधकाम अभियंता सुनिल भोळे, अतिक्रमण अधिक्षक एच.एम.खान यांनी शहरात पाहणी केली. अनेक ठिकाणी असलेले भाजी-फळ बाजारातील नागरिकांना सुचना देवून उद्या पासून रस्त्यावर भाजीपाला विक्री करतांना आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सुचना दिल्या आहे. 


 गोलाणीमधील ओटे सोडत द्वारे देणार 
गोलाणी मार्केट तळघरात 426 ओटे असून नोंदणीकृत विक्रेते 450 आहेत. बळीराम पेठ, शनिपेठ आणि 
सुभाष चौकातील गर्दी टाळण्यासाठी विक्रेत्यांना सोडतीद्वारे गोलाणीतील ओटे वितरित करण्यासंदर्भात नियोजन सुरु आहे. जवळपास 350 विक्रेत्यांना ओटे दिले जाणार आहेत. तसेच सद्यस्थितीत ओट्यांवर बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांना 14 मेपर्यंत खाली करण्याचे आदेश उपायुक्त वाहुळे यांनी दिले आहेत. 

आठवडे बाजार बंद 
लॉकडॉन नंतर शहरात जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील सर्व आठवडे बाजार बंद केले आहे. तरी देखील अनेकठिकाणी हे बाजार भरत आहे. त्यानुसार हरिविठ्ठल मधील आठवडे बाजार आज महापालिकेने बंद केला असून यापुढे आठवडे बाजारात दुकान लावणाऱ्यांवर मनपा कारवाई करणार आहे. याबाबत नागरिकांनी स्वःताची काळजी घ्यावी, आठवडे बाजारात जावू नये ते बंद असल्याचे आवाहन महापालिका प्रशासाने केले आहे. 
 

loading image