आईच्या डोळ्यादेखत त्याचा जीव गेला...ती काहीच नाही करू शकली

boy death
boy death

जळगाव : दारूच्या नशेत मोबाईलवर बोलत असतांना आईसमोर तरूणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. विहीर पाण्याने तुडूंब भरली असल्याने आणि रात्र झाल्याले बचाव कार्य राबवता आले नाही. अखेर आज सकाळी मृतदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी नशिराबाद पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

सुरेश नथ्थू पाटील यांचे कळगाव रस्त्यावरील जळगाव खुर्द शेतशिवारात मध्यप्रदेशातील पावरा कुटूंबीयांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. साधारण पंधरा वर्षापासून सालदार याच खोल्यांमध्ये वास्तव्यास राहत आहे. जितेन सुकराम ठाकुर (वय-25) रा. चिरीया, मध्यप्रदेश हा त्याची विधवा आई भुरीबाई, व तीन भावांसह वास्तव्यास आहे. शेती कामाला चाणाक्ष व मेहनती जितेन काल संध्याकाळी 5:30 जळगाव खुर्द येथील गावठी अड्ड्यावरुन दारु ढोसून शेतात परतला. मोबाईलवर बोलत-बोलतच तो येत होता. फोनवर कुणाशी तरी त्याचा वाद सुरु असतांनाच त्याने धावत धाव येवून कठडे असलेल्या विहरीत उडी घेतली. जितेन याने विहरीत उडी घेतल्याने शेतातील सालदार कुटूंबीयांनी मदतीला धाव घेतली. बॅटरीकांसह विहीरीत पोहणारे उतरवण्यात आले होते. मात्र, रात्रीचा अंधार आणि तुडूंब भरलेल्या विहीरीतील पाण्यामुळे मृतदेह सापडत नसल्याने रात्री शोध मोहिम थांबवण्यात आली. आज सकाळी पट्टीचे पोहणारे बोलावून जितेनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. नशिराबाद पोलिसात या प्रकरणी अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. 

आईच्या डोळ्या देखत.. 
रविवार हा पगाराचा दिवस असल्याने सालदारांना आठवड्याची मजुरी शेत मालका कडून वाटप झाली होती. काम संपल्याने शेतातील खोल्यांच्या बाहेर इतर सालदार महिलांमध्ये भुरीबाई बसलेली होती. संध्याकाळी 5:30 वाजेच्या सुमारास जितेन ठाकूर समोरून मोबाईल बोलतच येत होता. त्याने दारु प्यायल्याने तसा तो, फोनवरच कुणाशी तरी वाद घालत होता. बोलता बोलता त्याने विहीरी जवळ येवून चक्क उडी घेतल्याने आई भुरीबाई किंचाळून उठली..इतर मजुरांनी मदतीला विहरीच्या दिशेने धाव घेतली. डोळ्यादेखत मुलाने आत्महत्त्या केल्याने भुरीबाई कालपासून अश्रूढाळत बसली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com