आम्हाला बांगड्यांचा सार्थ अभिमान फडणवीसांनी सांभाळून बोलावे : खा. सुप्रिया सुळे  

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 February 2020

जळगाव : आम्हा महिलांना बांगड्यांचा सार्थ अभिमान आहे, राज्याचे विरोधी पक्ष नेत्यांनी महिलाविषयी असे शब्द वापरणे हे दुर्दैवी आहे, त्यांनी महिलाविषयी सांभाळून बोलावे ही त्यांना विनंती असेल. अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रीया सुळे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला आहे. 

हेपण पहा - रक्षा खडसे आवडत्या खासदार : सुप्रिया सुळे

जळगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीतर्फे देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. फडणवीस यांच्या प्रतिमेला बांगड्यांचा आहेर घालण्यात आला. त्यावेळी आम्हाला आमच्या बांगड्यांचा सार्थ अभिमान आहे, महिलांचा अपमान करणाऱ्या फडणवीसांचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा मंगला पाटील तसेच इतर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. यावेळी बोलतांना खासदार सुप्रिया सुळे पत्रकारांशी बोलतांना म्हणाल्या, आम्हा महिलांना बांगड्यांचा सार्थ अभिमान आहे,जिजाऊंनी घातल्या त्यानीं शिवबाला जन्म दिला, ताराबाईनी घातल्या त्या लढल्या, सावित्रीबाई फुले यांनी घातल्या त्यानीं स्त्रीयांना शिक्षण दिले. त्यामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेत्यांनी बांगड्याबाबत बोलून महिलांचा असा अपमान करणे योग्य नाही. आपली त्यांनी विनंती राहणार आहे, कि यापुढे त्यांनी महिलांचा अपमान करू नये,त्यांनी महिलाविषयी सांभाळून बोलावे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon ncp mp supriya sule fadanvis statement