esakal |  रक्षा खडसे आवडत्या खासदार : सुप्रिया सुळे
sakal

बोलून बातमी शोधा

Raksha Khadse- Supriya Sule.

 रक्षा खडसे आवडत्या खासदार : सुप्रिया सुळे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : संसदेतील माझ्या आवडत्या खासदारापैकी भाजपच्या रावेर लोकसभा मतदार संघातील रक्षा खडसे या आवडत्या खासदार अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे कौतुक केले. 
खासदार सुप्रिया सुळे आज जळगाव दौऱ्यावर आहेत.जळगाव येथे अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महाविद्यालयात त्यानीं विद्यार्थिनींशी संवाद साधला, यावेळी त्यानीं जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघातील भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचे कौतुक केले,

हेपण पहा - स्मिताताईंमधील रणरागिणीचा झाला 'उदय'

त्या म्हणाल्या खासदार रक्षा खडसे या धडपड करणारे नेतृत्व असून त्यांचे मला नेहमीच कौतुक वाटते.माझ्या आवडत्या खासदारापैकी त्या एक खासदार आहेत. 
राजकारणात वैचारिक मतभेद असतात,पक्षही वेगळे आहेत. परंतु चांगल्या कामाचे कौतुक राजकारणापलीकडे जावून केले पाहिजे.हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे.पक्ष वेगळे असले तरी वैयक्तीक संबधात कधीही कटुता यायला नको.मात्र पाच वर्षात जेंव्हा निवडणूका होतील तेंव्हा त्यांच्या विरोधात जाहिर सभेत भाषण करू असे मतही त्यांनी व्यक्त केले. 

खासदार सुप्रिया सुळे बनल्या वृत्तनिवेदिका 
नमस्कार, आज सकाळच्या ठळक बातम्या....शेतकऱ्यांच्या खात्यात तीन महिन्यात कर्जमुक्तीची रक्कम जमा होईल अशी माहिती विधानसभेत अजितदादा पवार यांनी दिली. अशा खास वृत्तनिवेदिकेच्या शैलीत खासदार सुप्रिया सुळे यांनी बातमीपत्राचे वाचन केले. जळगाव येथे अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महाविद्यालयाच्या सेंटर "मास मिडीया कम्युनिकेशन'या विभागाला त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी वृत्तनिवेदिका म्हणून बातमीपत्राचे वाचन केले. जी.डी.बेंडाळे महाविद्यालयाला भेट देवून विद्यार्थीनीशी संवाद साधला.यावेळी त्यांनी महाविद्यालयाच्या "सेंटर फॉर मास मिडीया कम्युनिकेशन'या विभागाला भेट देवून पाहणी केली. या विभागात त्यांनी वृत्तनिवेदिका बनून थेट बातमीपत्रही सांगितले. 
 

loading image
go to top