'पद्मावत'च्या विरोधात कजगावला कडकडीत बंद

प्रमोद पवार
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

या संदर्भात निषेध करीत पद्मावत चित्रपटामुळे इतिहासाची मोडतोड झाली असून, समाजाच्या भावना दुखावल्या असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या चित्रपटाला विरोध दर्शविण्यासाठी करणी सेनेच्या 'भारत बंद'च्या आवाहनाला प्रतिसाद देत कजगावला कडकडीत बंद पुकारण्यात आला होता.

कजगाव (ता. भडगाव) : वादग्रस्त ठरलेला 'पद्मावत' चित्रपटाच्या प्रदर्शनास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला असला, तरी विविध संघटनाचा विरोध कायम आहे. तरी पद्मावत प्रदर्शित करू नये. या मागणीसाठी गुरुवारी (ता. 26) कजगाव येथील राजपूत समाजाच्या वतीने गाव बंद करण्यात आले. 

या संदर्भात निषेध करीत पद्मावत चित्रपटामुळे इतिहासाची मोडतोड झाली असून, समाजाच्या भावना दुखावल्या असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या चित्रपटाला विरोध दर्शविण्यासाठी करणी सेनेच्या 'भारत बंद'च्या आवाहनाला प्रतिसाद देत कजगावला कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. गावातील व्यापाऱ्यांनी पाठिंबा देत सहभाग घेतला. तसेच आपली प्रतिष्ठाने व दुकाने सकाळपासूनच बंद ठेवली होती. नागरिकांनी देखील सहकार्य करीत शांततेत दिवसभर हा बंद करण्यात आला. 

हा बंद यशस्वीसाठी यावेळी राजपूत समाज वतीने विलास राजपूत, नरेश राजपूत, भावडू राजपूत, बंटी राजपूत, उमेश राजपूत, हीतेश राजपूत, फत्तेसिंग राजपूत, भीमसिंग राजपूत, योगेश राजपूत, उमेश राजपूत, महेद्र राजपूत, सनी राजपूत,  कुमारसिंग राजपूत,जयपाल राजपूत,प्रसाद राजपूत,निलेश राजपूत,दादाभाऊ राजपूत, धुर्वसिंग राजपूत, भुपेंद्रसिंग राजपूत,विशाल राजपूत,उल्केश राजपूत,सागर राजपूत,राहुल राजपूत,सोनुसिंग राजपूत,अशोक राजपूत पृथ्वीराज राजपूत जितेंद्र राजपूत,रोशन राजपूत,विक्की राजपूत आदीसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्यित होते.

बंदमध्ये पिण्याच्या पाणीची व्यवस्था 

या चित्रपटाविरोधात राजपूत समाजाच्यावतीने बंद पुकारण्यात आला होता. यामुळे सगळीच दुकाने बंद असल्याने नागरिक आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून बंददरम्यान गावातील मुख्य बसस्यानक व नागद रस्तावर ठिकठिकाणी नागरिकांना पाणी पिण्यासाठी जारची व्यवस्थादेखील करण्यात आली होती.

आपल्या समाजाच्या मागणीसाठी बंद पुकारला असला, तरी आपले सामाजिक दायित्व म्हणून आम्ही हे नियोजन केले, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. यामुळे बाहेर गावातील नागरिकांनी कौतुक देखील केले.

Web Title: Marathi News Jalgaon News padmavat protest bandh