पानमळ्यांना विमा संरक्षण, पानाला आयुर्वेदाचा दर्जा द्या! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

जळगाव ः राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये बहुसंख्य बारी समाज विखुरलेला आहे. देशातील इतर राज्यात सुद्धा बरई, तांबोळी, चौरासिया, कुमरावत, बारी समाज चौफेर पसरलेला आहे. बारी समाजातील सर्व पोट जातींनी एकत्र यावे तरच दबावगट निर्माण होईल. दरवर्षी महासंमेलन घेणे आवश्‍यक आहे, सोबतच अनेक बारी समाज बांधव पारंपरिक पद्धतीने पानमळ्यांची शेती करतात. यामुळे विड्याच्या पानांना आयुर्वेदाचा दर्जा, पानमळ्यांना विमा संरक्षण शासनाने द्यावे, अशा मागण्या आज जळगाव शहरातील बारी समाजबांधवांनी "सकाळ' संवाद कार्यक्रमात व्यक्त केल्या. 

"सकाळ'च्या शहर कार्यालयात मंडळाची गटचर्चा झाली. बारी समाजाच्या नगरसेविका शोभा दिनकर बारी, नागवेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. नितीन बारी, उपाध्यक्ष भरत बारी, लतिश बारी, अतुल बारी, रमेश बारी, हर्शल बारी, सुनील बारी, राजेंद्र बारी, महेंद्र बारी, मनोज बारी, प्रवीण बारी उपस्थित होते. 

जळगाव जिल्ह्यातील बारी समाजबांधव पानशेती मोठ्या प्रमाणात करतात. पानमळ्यावर संशोधन होऊन पानांना आयुर्वेदाचा दर्जा मिळावा, पूर्वी समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी होते. आता युवक वर्ग शिक्षण घेऊन उच्च पदापर्यंत पोचला आहे. या युवकांना स्वयंरोजगारासाठी कर्ज व जागा उपलब्ध करण्यात यावी, युवकांचे संघटन चांगल्या प्रकारे असल्याने युवकांनी राजकारणात उतरून समाजाला न्याय मिळवून द्यावा, समाजातर्फे दरवर्षी वधूवर परिचय मेळावा, गुणवंतांचा सत्कार कार्यक्रम होतो. 

अनेकांकडे टॅलेंट... 
बारी समाजातील अनेक युवकांकडे टॅलेंट आहे. शिरसोली येथील एक युवक बॉलिवूडमध्ये संगीतकार आहे. अनेक जण डॉक्‍टर, सी. ए., वकील आदी उच्च पदांवर आहे. मात्र युवकांचा ओढा एमपीएससी, यूपीएससीकडे फारसा नाही. युवक या क्षेत्रात यावा, यासाठी अशा स्पर्धेसाठी "सकाळ'ने व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याने आभार मानण्यात आले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon panmada policy aayurved