विभाग नियंत्रकाला महिला वाहकाची स्थानकातच मारहाण 

bus district contoler deore
bus district contoler deore

जळगाव ः परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक असलेले राजेंद्र देवरे यांच्या विरूद्ध विनयभंगाचे गुन्हा अक्‍कलकुवा येथील महिला वाहकाने दाखल केला होता. या दोघांमध्ये आज जळगाव बसस्थानकात बाचाबाची झाली. दरम्यान देवरे व महिला वाहकाची जिन्यामध्ये समारोसमोर भेट झाल्यानंतर त्या महिला वाहकाने चेहऱ्यावर स्प्रे मारून मारहाण केल्याचा प्रकार आज घडला. 
जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे हे यापुर्वी धुळे विभागात कार्यरत होते. दोन वर्षापुर्वी ते बदली होवून जळगाव येथे आले आहेत. दरम्यान विभाग नियंत्रक देवरे यांच्यावर धुळे येथे असताना विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एका गुन्ह्यातील फिर्यादी असलेल्या महिला वाहक यांच्याशी आज बाचाबाची होऊन एकमेकांना मारहाण झाल्याची घटना आज (ता.6) बसस्थानकावर घडली. महिला वाहकाच्या उजव्या हाताला मार लागलेला आहे. महिला वाहकाच्या आरोळ्या, त्यांच्या मुलीचे जोरजोरात रडणे व विभाग नियंत्रकांची धावपळ पाहून प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती. हा प्रकार पाहण्यासाठी बसस्थानकात गर्दी होऊन काहीवेळ वाहतूक खोळंबली होती. 

बॅंकेच्या कामासाठी आल्या जळगावी 
अक्‍कलकुवा आगारात कार्यरत असलेल्या महिला वाहक या बॅंकेच्या कामानिमित्त जळगाव येथे मुलीसह आल्या होत्या. सकाळी साडेदहाच्या सुमारास विभाग नियंत्रक देवरे हे देखील बसस्थानकातील जिन्यावरून कार्यालयात जात असतांना दोघांची जिन्यातच भेट झाली. यावेळी दोघांची शाब्दिक चकमक झाली. यावेळी तिने त्यांचा अंगावर स्प्रे मारल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. 

स्थानक प्रमुखांनी केली मध्यस्थी 
देवरे हे बसस्थानकात आल्याने स्थानक प्रमुख निलीमा बागुल यांच्याशी काही वेळ चर्चा करत खाली उभे होते. यानंतर ते आपल्या दालनात जाण्यासाठी जिन्याने वर जात असताना हा प्रकार घडला. स्थानक प्रमुख बागुल या देखील आपल्या दालनात आल्या होत्या. याच दरम्यान देवरे हे जिन्यातून धावत निलिमा बागुल यांच्या दालनात आले. त्यांच्या मागे ती महिला कर्मचारी देखील होती. यावेळी निलिमा बागुल यांनी महिलेला अडवून बाहेर काढले. तसेच महिला वाहकास स्थानक प्रमुख कार्यालयात डांबून ठेवले. यानंतर विभाग नियंत्रक देवरे यांना रूग्णालयात नेण्यात आले होते. 

पुर्वनियोजित डाव 
अक्‍कलकुवा येथील महिला वाहक कर्मचारी यांनी देवरेंना मारहाण करण्याचा डाव अगोदरपासूनच रचल्याचे सांगण्यात येत आहे. कारण सकाळी साडेदहाला देवरे बसस्थानकात आल्यानंतर सदर महिला कर्मचारी या जिन्यात दबा धरून उभ्या होत्या. देवरे कार्यालयात जात असताना महिला वाहकाने त्यांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून त्यांना मारहाण केले. या प्रकाराचे व्हिडीओ चित्रीकरण मोबाईलमध्ये रेकॉर्डींग करण्यात आले आहे. यामुळे हा संपुर्ण प्रकार पुर्वनियोजित असल्याचे बोलले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com