टिकटॉकवर पंतप्रधानांवर अक्षेपार्ह्य व्हिडीओ; चार संशयीतांना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

रामानंदनगर पोलिसांनी जुबेर अकील खाटीक (18), जाफर शकील खाटीक (22), अकबर सलीम सैय्यद (18) व अरबाज शकील सैय्यद (19) सर्व रा.वंजारी टेकडी, समता नगर,जळगाव) अशा चौघांना ताब्यात घेत त्यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव : शहरातील समता नगर परिसरात सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करुन तो, व्हायरल केल्यावरुन दोन गटात तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.  
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समता नगरातील चौघांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी टीकटॉक या सोशल मीडिया ऍपवर आक्षेपार्ह व्हिडीओ बनविला. सोमवारी हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला. शहरातील एका गटाने हा व्हिडीओ पाहिल्यानंतर दहा ते बारा जणांचा जमाव समता नगरात या चारही तरुणांकडे चालून गेला. वातावरण चिघळून अप्रीय घटना घडण्या पुर्वीच रामानंदनगर पोलिसांना माहिती मिळाली. सहायक फौजदार गोपाळ चौधरी, सतीश डोलारे, महेंद्र पाटील, वासुदेव मोरे आदींचे पथके दोन वाहनातून घटनास्थळी पोहचले. पोलिसांना पाहताच एक गट फरार झाला तर पळापळ झाली. अधिकच्या चौकशीत जुबेर, जाफर, अकबर व अरबाज या चौघांनी आक्षेपार्ह व्हिडीओ बनविल्याचे उघड झाले. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी अधिक चौकशी करुन त्यांचे मोबाईल जप्त केले. दरम्यान, चौघांवर धार्मिक भावना भडकावून दोन गटात तेढ निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चौघांवर गुन्हा ; मोबाईल जप्त 
दोन गटातील वाद असल्याने काही रहिवाशांनी रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली होती, चौघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांचे मोबाईल गुन्ह्यात जप्त केले असुन परिसरात तणावाचे वातावरण पसरल्याने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon pm modi tik tok video social media viral and police case