वेश्‍या व्यवसायातून तिला बाहेर काढून लग्नाचा केला बनाव; पुन्हा लोटले त्या खाईत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 मार्च 2020

जळगाव : चोपडा येथील 35 वर्षीय पीडितेला गावगुंडांनी बळजबरीने वेश्‍या व्यवसायाला भाग पाडून तिचे शोषण सुरू होते. या पीडितेला तेथून सोडविण्यास मदत करणाऱ्याने तिच्याशी लग्नाचा बनाव करून पुन्हा गैरकृत्याच्या दलदलीत ढकलून दिले. विरोध केल्यावर ठार मारण्यासाठी तिच्या मागावर आहेत. जिवाला धोका असतानाही स्थानिक पोलिसांनी दादपुकारा न घेतल्याने पीडितेने थेट विशेष पोलिस महानिक्षिकांची भेट घेऊन आपबिती कथन केली. अखेर शनिवारी रात्री जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

क्‍लिक करा - पोलिसांनी जीवंत नेला अन्‌ रूग्णालयात मृतदेह भेटला

पुण्यातून आणून अडकविले 
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, साधारण पंधरा वर्षांपूर्वी पुण्यातून या पीडितेला आणून चोपड्यातील वेश्‍या व्यवसायात अडकविण्यात आले होते. मात्र, कुंटणखाना मालकीणकडून होणाऱ्या छळाला कंटाळल्याने गावातीलच रवींद्र छबू सोनवणे (पाणीवाला) याने तेथून पीडितेची सुटका करण्यास मदत केली होती. परिणामी, पीडितेचा त्याच्यावर विश्‍वास बसला, नंतर त्यानेच लग्नाचे आमिष दाखवून चोपड्यात आणले. गडावर रितीरिवाजाप्रमाणे विवाह केला. भाड्याने खोली घेऊन देत नव्याने संसारही थाटला. मात्र, काही दिवसांतच पीडितेचा तोच छळ पुन्हा सुरू झाला. रवींद्रने पीडितेचे अंगावरील दागीने गोड बोलून घेऊन त्याच वेश्‍यावस्तीत जागा घेऊन नव्याने व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 

जीपखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न 
पीडितेने आवाज उठविल्यावर 24 फेब्रुवारीला चारचाकी जीपखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी पीडितेला आठ ते दहा गुंडांनी घरातून ओढून काढत बेदम मारहाण करून अर्धमेल्या अवस्थेत सोडून पळ काढला होता. चोपडा ग्रामीण रुग्णालयात दाखल असताना चोपडा शहर पोलिसांनी तक्रार करूनही दखल घेतली नाही. परिणामी, पीडितेने थेट नाशिक पोलिस महानिरीक्षकांची भेट घेऊन घडलेले आपबिती कथन केली. त्यानुसार त्यांच्या आदेशानुासर पीडितेच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात रवींद्र छबू सोनवणे, जितेंद्र ड्रायव्हर, बबलू, बंटी वाघ, किरण मराठे, रवींद्र मराठे, मंगलाबाई मराठे, संजू भालेराव, भोला कोळी यांच्याविरुद्ध बलात्कार, प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून शून्य क्रमांकाने गुन्हा चोपडा शहर पोलिसांना वर्ग करण्यात आला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Prostitute aria women out and merrage boy