घोडा काढ घोडा..धमकवत रेल्वेस्थानकावर एकावर हल्ला

boys aatack
boys aatack

जळगाव : शहरातील रेल्वेस्थानकावर वाघनगरातील तरुणावर आठ ते दहा जणांच्या टोळक्‍याने हल्ला चढवल्याची घटना दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून उपचारा दरम्यान दुपारी चार वाजता पुन्हा समता नगर टेकडी जवळ याच प्रकरणातून तुंबळ हाणारीची घटना घडली. 


जिल्हा सामान्य रुग्णालयात खासगी सुरक्षा रक्षक चेतन संजय कोरोसीया(वय-25) या तरुणांच्या वाघ नगर येथील घरी बाळाचे जाऊळ काढण्याचा कार्यक्रम होता. आजच त्याच्या लग्नाचा वाढदिवसही असल्याने नातेवाईक कुटूंबीयाची घरी गर्दी होती.चेतनचा शालक व सासरवाडीची मंडळी बाहेरगावाहुन येत असल्याने तो, त्यांना घेण्यासाठी साडेबारा वाजता रेल्वेस्थानकावर आला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या पुतळ्या जवळ अजय गरुड, बोबड्या बबलू यांच्यासह 8-10 तरुणांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. डोक्‍यात काचेच्या बॉटल्या फोडून चॉपरचा धाक दाखवल्याचे जखमीने सांगतले. घोडा काढ घोडा, म्हणत पिस्तुल काढण्याची धमकी मारहाण करणारे देत होते. जखमी चेतनला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचार सरु असतांनाच वाघनगर, समतानगर परिसरातील शंभर ते दिडशे तरुणांचा जमाव रुग्णालयात एकवटल्याने एकच गोंधळ उडाला. मारहाण करणाऱ्यांमध्ये अजय गरुड, बोबड्या, विजय रोहित अशांची नावे त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात लिहून घेतल्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. 

आदल्या रात्रीचा वाद 
वाघनगर परिसरात शुक्रवारी रात्री हळदीचा कार्यक्रम असल्याने डी.जे.वाजवण्यावरुन दारुच्या नशेतील तरुणांचा आपसात वाद सुरु होता. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. गोंधळ घालणारे टोळके चेतन कोरोसियाच्या घरा पर्यंत येत असल्याने त्याने पिटाळून लावले. याचाच राग मनात ठेवुन गेंदालालमील मधील टोळक्‍याने चेतनवर रेल्वेस्टेशन परिसरात आला असतांना हल्ला चढवला. 

काव्यरत्नावली चौकात पुन्हा हल्ला 
चेतनवर साडेबारा वाजता रेल्वेस्थानकावर हल्ला झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात हेरगीरी करण्यास आलेल्या दोघांना जमावाने बदडून काढले. हा वाद शांत होत नाही तोवर दुपारी चार वाजेच्या सुमारास पुन्हा चेतन करोसियाचे नातेवाईक मित्र विशाल अनील घेंगट(वय-21) व निहाल संजय शिंदे(वय-19) असे दोघेही सिव्हील मधुन समतानगर घराकडे जात असतांना काव्यरत्नावली चौकात त्यांची दुचाकी अडवून अजय गरुड व त्याच्या साथीदारांनी पुन्हा चॉपरने हल्ला चढवला. दोघा जखमींना तातडीने उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून उपचार सुरु होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com