जिल्ह्यात कृषी विद्यापीठासाठी मुख्यमंत्री अनुकूल : आमदार खडसे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

रावेर : जिल्ह्यात कृषी विद्यापीठ होण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. त्यांनी यासाठी अनुकूलता दर्शविली असल्याचे प्रतिपादन माजी महसूल मंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांनी आज केले. 

ऐनपूरच्या गुर्जर समाज मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कृषी विभागातर्फे गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन शिबिर आणि गुर्जर मंडळाच्या मंगल कार्यालयात सुमारे 10 लाख रुपये खर्चाच्या पेव्हर ब्लॉकचे भूमिपूजन श्री खडसे यांच्या हस्ते झाले. 

श्री खडसे म्हणाले की, या विद्यापीठासाठी तज्ज्ञ समितीने शिफारस केली आहे, फक्त मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने मंजुरी आणि निधी देण्याची गरज आहे. ऐनपूरला वाढत्या वाहतुकीमुळे गावाबाहेरून वाहतूक रस्ता करण्यासाठी 32 लाख रुपये खर्च करून रस्ता करण्याचा प्रस्ताव आहे. येथे स्मशानभूमी, प्राथमिक आरोग्य केंद्र, शेतरस्ते, गटारी आदी कामे पूर्ण झाली. ऐनपूर ते निंभोरासीम हा रस्ता 73 लाख रुपये खर्च करून तयार होईल, तो सिमेंटचा असल्याने किमान 20 वर्ष टिकेल. 

यावेळी इस्राईल कृषी अभ्यास दौरा करून आलेल्या प्रशांत महाजन, प्रेमानंद महाजन (तांदलवाडी), मनोज महाजन (ऐनपूर) आणि सकाळचे बातमीदार दिलीप वैद्य यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. श्री वैद्य यांनी अनुभव कथन केले. कार्यक्रमास प्रा. सुनील नेवे, जिल्हा परिषद सदस्या रंजना पाटील, पंचायत समिती सदस्य जितू पाटील, सुनील पाटील, पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, उपसभापती अनिता चौधरी, राजीव पाटील, दत्तात्रय पाटील, प्रल्हाद पाटील, जिल्हा कृषी उपसंचालक अनिल भोकरे, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, युवराज पाटील, सरपंच योगिता भिल, राजेंद्र पाटील, विकास महाजन, सुनील पाटील, पी. एम. पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते. एन. व्ही. पाटील आणि मिलिंद अवसरमल यांनी सूत्रसंचालन केले. 

सरकारला जाग आणा 
आपल्याच सरकारला जाग आणण्याची वेळ आली आहे अशी खंत श्री खडसे यांनी केळीच्या नुकसान भरपाई विषयावर बोलताना केली. मध्यप्रदेश सरकार हेक्‍टरी एक लाख रुपये भरपाई देत असताना आपले सरकार हेक्‍टरी फक्त 18 हजार रुपये देत आहे ही शेतकऱ्यांची एक प्रकारे टिंगल आहे. आपण यासाठी पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon raver khadse agriunivercity