रावेर तालुक्यात वादळी पावसाचा तडाखा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 May 2019

रावेर ः तालुक्यातील खिरोदा परिसरातील सात गावांना मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळाचा जोरदार फटका बसला आहे. आज दुपारी आलेल्या वादळी पावसाने अंगावर झाड कोसळून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या भागात केळीचेही नुकसान झाले आहे. 

रावेर ः तालुक्यातील खिरोदा परिसरातील सात गावांना मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळाचा जोरदार फटका बसला आहे. आज दुपारी आलेल्या वादळी पावसाने अंगावर झाड कोसळून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या भागात केळीचेही नुकसान झाले आहे. 
तालुक्यातील खिरोदा प्र यावल, सावखेडा बुद्रुक, सावखेडा खुर्द, कोचूर बुद्रुक, कोचूर खुर्द, रोझोदा, विवरा, भातखेडा, उटखेडा, चिनावल आदी परिसरात दुपारी दोनच्या सुमाराला हलका ते मध्यम स्वरुपाचा वादळी पाऊस झाला. यावेळी राहुल पुंडलिक पाटील (वय ३५ वर्ष, रा. उटखेडा) आणि आशा दत्तात्रय अमोदकर (रा. बडोदा) हे भातखेड्याजवळ अंगावर झाड कोसळून जखमी झाले आहेत. रोझोदा येथील घरकुलातील घरांचे पत्रे उडून नुकसान झाले आहे. चिनावलसह परिसरात आज दुपारी दोनच्या सुमारास एक ते दीड तास वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. 

सावखेड्या केळीचे मोठे नुकसान 
सावखेडा येथील प्रमोद फेगडे यांची केळीची बाग पूर्ण आडवी झाली आहे. त्यांच्या सुमारे अडीच हजार झाडांचे नुकसान झाले आहे. तसेच वत्सलाबाई महाजन २५०० केळी खोडे, नीलेश महाजन १५०० खोडे, राजेंद्र महाजन आणि जगन चौधरी प्रत्येकी एक हजार खोडे, तसेच प्रमोद महाजन, जगन्नाथ चौधरी यांच्यासह सुमारे १५ ते २० शेतकऱ्यांची सुमारे ३० हजार खोडे जमीनदोस्त झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या वादळाने हिरावून घेतल्याची स्थिती निर्माण झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon raver rain vadal