अधिकाऱ्यांत समन्वयाचा परिणाम...महसूलची शंभर टक्‍के वसूली ! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

अवघ्या महिन्याभरात चाळीस कोटींची वसुली जिल्हा प्रशासनाच्या यंत्रणेनी करून दिली. "कोरोना'मुळे लॉकडाऊनच्या काळात एवढी वसुली झाल्याने प्रशासनामध्ये मार्चअखेरची टारगेट पूर्ण केल्याचे सर्वच अधिकाऱ्यांमध्ये समाधान आहे. 

जळगाव ः "कोरोना'चा संसर्ग होऊ नये यासाठी जिल्ह्यात 23 मार्चपासून लॉकडाउन आहे. यामुळे शासनाच्या विविध विभागांनी नागरिकांकडून करावयाची वसुली (जीएसटी, महापालिका, पालिका कर, आदी कर) थांबले आहेत. असे असताना जिल्हा प्रशासनाने मात्र जिल्ह्याला दिलेल्या महसुली उद्दिष्ठांची शंभर टक्के वसुली पूर्ण केली आहे. 

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशभरात 23 पासूनच लॉकडाउन झाले. यामुळे अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद आहेत. विविध कंपन्या, दुकाने, कार्यालये बंद आहेत. यामुळेच 31 मार्च अखेर होणाऱ्या व्यवहारांनाही तीन महिने पूर्ण करण्यास मुदत वाढ दिली आहे. इन्कम टॅक्‍स, जीएसटी आदी करांचा भरणा भरण्यास मुदत वाढ आहे. नागरिकांना लॉकडाउनच्या काळात बाहेर पडता येणार नाही व नागरिकांनी बाहेर पडू नये म्हणून ही दक्षता घेण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी विविध करांचा भरणा पुढे ढकल्ला आहे. शासनाच्या गंगाजळीत मार्च महिन्यात येणारा कराचा भरणाही थांबला आहे. शासनाच्या विविध विभागांना "बीडीएस' प्रणालीवरून बिले काढता न आल्याने कोट्यावधींचा निधी शासनाला समर्पित करावा लागला. 
जिल्हा प्रशासनाला यंदा 140 कोटी 65 लाखांचे उद्दिष्ठ शासनाने दिले होते. 

नक्की वाचा : कोरोना'चे सावट...हनुमान भक्तांनी घरूनच केली पूजाअर्चा 

ही वसुली 31 मार्च अखेर करावयाची होती. जिल्ह्यात मार्चच्या सुरवातीसच शंभर कोटींची वसुली झाली होती. अवघ्या महिन्याभरात चाळीस कोटींची वसुली जिल्हा प्रशासनाच्या यंत्रणेनी करून दिली. "कोरोना'मुळे लॉकडाऊनच्या काळात एवढी वसुली झाल्याने प्रशासनामध्ये मार्चअखेरची टारगेट पूर्ण केल्याचे सर्वच अधिकाऱ्यांमध्ये समाधान आहे. 

तालुकानिहाय उद्दिष्ठ--झालेली वसुली टक्‍क्‍यांमध्ये 
जामनेर--10 कोटी--115 टक्‍के 
यावल--7 कोटी--109 
भुसावळ--13 कोटी 50लाख--100 
एरंडोल--9 कोटी 30 लाख---100 
भडगाव--4 कोटी 50 लाख--100 
चाळीसगाव--13 कोटी 50 लाख--100 
अमळनेर--8 कोटी 50 लाख--100 
रावेर--7 कोटी--101 
पाचोरा--10 कोटी--101 
पारोळा--4 कोटी--100 
बोदवड-3 कोटी 5 लाख-100 
जळगाव--29 कोटी--100 
मुक्ताईनगर-7 कोटी--101 
धरणगाव--7 कोटी 30 लाख--100 
चोपडा---7 कोटी--100 

आर्वजून पहा : "थम' च्या सवलतीमूळे अधिकारी व्यग्र...रेशन दुकानदार मस्त ! 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon The result of coordination amokong the officers Recover 100% of revenue!