रस्ते, गटारींसाठी शंभर कोटी आणणार : आमदार भोळे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

जळगाव : भाजपने महापालिका निवडणुकीत "फिफ्टी प्लस' मिशन आखले होते. जळगावकरांनी त्याला भरभरून साथ दिली आहे. त्यामुळे आपण जळगावकरांचे ऋणी आहोत. आम्ही जलसंपदामंत्री यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांना भेटून पहिल्याच टप्प्यात रस्ते, गटारींसाठी शंभर कोटी आणणार आहोत, अशी ग्वाही आमदार सुरेश भोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

निवडणूक निकालानंतर भाजपतर्फे बळिरामपेठेतील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सुभाष शौचे, विशाल त्रिपाठी, दीपक सूर्यवंशी, मनोज भांडारकर, नगरसेवक नवनाथ दारकुंडे उपस्थित होते. आमदार भोळे म्हणाले, की शहराच्या विकासाला जनतेने मत देऊन आम्हाला विजयी केले आहे. त्यामुळे आमची कामाची जबाबदारी वाढली आहे. आम्ही निश्‍चित जळगावचा विकास करणार आहोत. फेरीवाला धोरण आणि गाळ्यांचा प्रश्‍न आम्ही प्रथम सोडविणार आहोत. तसेच हुडकोच्या कर्जाचे आम्ही लवकरच सेटलमेंट करणार आहोत. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, तसेच आमदार चंदुलाल पटेल, आमदार स्मिता वाघ व मी उद्या (ता. 4) मुबंईत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. रस्ते, गटारींच्या मूलभूत सुविधांच्या विकासासाठी शंभर कोटी रुपये पहिल्या टप्प्यात आम्ही आणणार आहोत. आम्ही शहराच्या विकासासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहोत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon road 100 carore bhole