नियम मोडला... बारा दुकाने सिल 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

लॉकडाऊनचा नियम मोडत शहरातील सुवर्ण बाजार पेठ तसेच फुले मार्केटमधील काही व्यवसायिकांनी आपले दुकाने उघडली होती. त्यामुळे बाजारात गर्दी होत असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांना मिळाली. त्यांनी लगेच आतिक्रमण विभागाचे अधिक्षक एच. एम. खान व त्यांच्या पथकाला सोबत घेवून सुवर्णबाजारात पाहणी केली.

जळगाव : कोरोना विषाणूचा प्रसार शहरात वाढत असून महापालिका प्रशासनाकडून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यात बाजार तसेच मार्केट परिसरात ज्या दुकानांना परवानगी नसून देखील उघडली आहे अशा दुकाने आज सिल करण्याची कारवाई महापालिकेच्या पथकाने केली आहे. यावेळी दुकानदारांनी महापालिकेचे अधिकारी व पथकातील कर्मचाऱ्यांशी वाद झाला. 

लॉकडाऊनचा नियम मोडत शहरातील सुवर्ण बाजार पेठ तसेच फुले मार्केटमधील काही व्यवसायिकांनी आपले दुकाने उघडली होती. त्यामुळे बाजारात गर्दी होत असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांना मिळाली. त्यांनी लगेच आतिक्रमण विभागाचे अधिक्षक एच. एम. खान व त्यांच्या पथकाला सोबत घेवून सुवर्णबाजारात पाहणी केली. यावेळी नियमांचे उल्लघण करून अनेक सुवर्ण व्यवसायिकांनी आपले दुकाने उघडली होती. तसेच काही दुकानात मोठ्या प्रमाणात ग्राहक देखील दिसून आले. तसेच फिजिकल डिस्टिन्सींग तसेच कोरोना विषाणू टाळण्या संदर्भात कोणत्या ही उपायोजना या दुकानात दिसून आल्या नाही. त्यामुळे अशा व्यवसायिकांचे दुकाने सिल करण्याची कारवाई महापालिकेने केली. 

बारा दुकाने केली सिल 
महापालिकेने आज केलेल्या कारवाईत बारा दुकाने सिल करण्यात आली आहे. त्यात सर्वात जास्त सहा दुकाने सुवर्ण बाजारातील आहे. तसेच काही दुकाने हार्डवेअरची तर काही दुकाने फुले मार्केटमधील धान्य तसेच स्टेशन, अगरबत्ती ऍजन्सी असे दुकाने सिल करण्यात आली. 

कारवाई प्रसंगी शाब्दीक वाद 
सुवर्णबाजारात उपायुक्त श्री. वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू असतांना अनेक व्यवसायिकांनी कारवाई करू नये यासाठी उपायुक्तांसह महापालिकेच्या अतिक्रमण निर्मलन विभागाच्या पथकाशी शाब्दीक वाद घातला. त्यामुळे अनेकदा कारवाईला दुकानदारांमूळे अडचणी येत असल्याने शासकीय कारवाईत अडथळा ज्यांनी आणला त्यांच्यावर कारवाई करण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाच्या सुत्राकडून मिळाली आहे. 

हे दुकाने झाले सिल... 
निर्मल ज्वेलर्स, डि. एस. प्लाझा ज्वेलर्स, जगदीश वर्मा सिसिटिव्ही शॉप, आर. सी. ज्वेलर्स, नंदुरबार ज्वेलर्स, बाविस्कर ज्वेलर्स, महालक्ष्मी ज्वेलर्स, भारत हार्डवेअर, कन्हैय्या अगरबत्ती एजन्सी, पवन पुरोहीत स्टेशनरी फुले मार्केट, उद्धव ट्रेडर्स फुले मार्केट, एच. टी. सदिकोर या दुकाने सिल करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon ruls broken market 12 shop seal