esakal | "सकाळ' वृत्ताची मंत्रालयाने घेतली दखल : केशरी शिधापत्रिका धारकांना मे, जूनचे धान्य मिळणार
sakal

बोलून बातमी शोधा

sakal Impact

सकाळ' गेल्या दोन दिवसांपासून प्रसिद्ध करीत आहे. याची दखल थेट मंत्रालयाने घेतली आहे. जळगाव जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिका धारकाना मे, जून महिन्याचे धान्य देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

"सकाळ' वृत्ताची मंत्रालयाने घेतली दखल : केशरी शिधापत्रिका धारकांना मे, जूनचे धान्य मिळणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : देशभरात लॉकडाऊन असताना जळगाव जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिका धारकांना धान्य मिळत नाही. कार्ड धारकांनी कधी जिल्हाधिकारी कार्यालयात तर कधी तहसील कार्यालयात गोंधळ घातल्या अशा बातम्या "सकाळ' गेल्या दोन दिवसांपासून प्रसिद्ध करीत आहे. याची दखल थेट मंत्रालयाने घेतली आहे. जळगाव जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिका धारकाना मे, जून महिन्याचे धान्य देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

हेपण वाचा - PHOTO साहेब, संसार उघड्यावर आहे...कुठे राहणार सांगा 


केशरी कार्ड धारकांना धान्य वाटपाबाबत अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ, प्रधान सचिव यांनी व्ही.सी.द्वारे धान्य वितरणाचा आढावा घेतला. त्यात वरील सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते. 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट न होऊ शकलेल्या व एपीएल केशरी योजनेत समाविष्ट न झालेल्या शिधापत्रिका धारकांना मे, जून या दोन महिन्याच्या कालावधीकरिता सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ द्यावा असे सांगण्यात आले. सोबतच एप्रिल महिन्यासाठी अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत देय नियमित धान्याचे वाटप त्वरित करावे, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत मोफत तांदूळ वाटप प्रमाण जळगाव जिल्ह्यात कमी आहे, ते वाढवावे. 

तांदळाची पोहच 30 एप्रिलपर्यंत 
एप्रिलचे मोफत तांदळाचे नियतन गोदामात पाठविण्यासाठी मे चे नियमित नियतनानुसार धान्य उचल थांबविण्यात आली होती. ही उचल मे महिन्याच्या मोफत तांदळाच्या उचली सोबत त्वरित सुरू करून 30 एप्रिलपर्यंत संपवावा. हे धान्य जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकानदारांपर्यत 30 एप्रिलपर्यंत पोहोच करण्यात यावे. जेणे करून धान्य वाटप 1 मे 2020 पासून करणे शक्‍य होईल. 

केशरी कार्डावर असे मिळेल धान्य.. 
एपीएल (केशरी) मधील लाभार्थ्यांना गहू 8 रुपये प्रति किलो, तांदूळ 12 रुपये किलो या दराने प्रति माह प्रति व्यक्ती तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ याप्रमाणे 5 किलो अन्नधान्य माहे मे व जून 2020 या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता देण्यात यावे. 

आधारसिडींग नसले तरी धान्य 
एपीएल (केशरी) मधील शिधापत्रिकाधारकांच्या नोंदी संगणकीय प्रणालीवर झाल्या नसतील अथवा त्या शिधापत्रिकाधारकांचे आधारसिडींग झाले नसेल तरी त्या शिधापत्रिकाधारकांना शासन निर्णयान्वये विहित केलेल्या दराने व परिमाणात अन्न धान्य देण्यात यावे. 

केशरी कार्डधारकांची यादी करा. 
तालुक्‍यातील अद्ययावत डी-1 रजिष्टर वरून केशरी शिधापत्रिका धारकांची यादी तयार करून तालुक्‍यातील सर्व रास्त भाव दुकानदारांना देण्यात यावी. त्यानुसार मे आणि जून 2020 चे धान्य एपीएल (केशरी) मधील लाभार्थ्यांना वाटप करण्यात यावे. धान्य वितरणासंदर्भात मंत्र्याकडे, जिल्हा कार्यालय आणि आपल्या स्तरावर प्राप्त होत असलेल्या तक्रारींबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावी, अशाही सूचना देण्यात आल्या. 

loading image