त्या' तीन मृतांच्या "स्वॅपचे' नमूने तपासणीला पाठवीले !

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

तिन्ही रुग्णांचे कोरोना संशयीत म्हणून स्वॅपचे नमुने घेण्यात आले आहे. हे नमुने तपासणीसाठी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविले असून त्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांचा मृत्यु नेमका कोणत्या कारणांमुळे झाला हे निश्‍चित करता येईल .

जळगाव जळगाव मध्ये तीन कोरोना संशयित महिलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. परंतू तीनही रूग्णांचे मृत्यू वेगवेगळ्या परिस्थितीतीत झाले असून मृत्यू झालेल्या तिन्ही रुग्णांचे कोरोना संशयीत म्हणून स्वॅपचे नमुने घेण्यात आले आहे. हे नमुने तपासणीसाठी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविले असून त्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांचा मृत्यु नेमका कोणत्या कारणांमुळे झाला हे निश्‍चित करता येईल अशी अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे. 

एक 63 वर्षीय महिला ब्रेस्ट कॅन्सरने आजारी होती तिच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिला पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते तिचा आज दुपारी मृत्यू झाला आहे. तसेच एक साडे तीन वर्षीय बालिकेला गेल्या तीन दिवसांपासून त्रास होत असल्याने तीच्या घरच्यांनी आज सकाळी एका खाजगी रुग्णालयात तीला ऍडमिट केले होते. उपचार सुरू असतानाच तिचा खासगी रुग्णालयातच मृत्यू झालेला आहे. तर एक 60 वर्षीय महिलेला श्वसनाचा त्रास होत असल्याने मंगळवारी दुपारी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिचा आज सायंकाळी मृत्यू झाला आहे. 

अपूर्ण माहिती पसरवू नये 
सर्वत्र कोरोनाचा फैलाव वाढत असून नागरिकांमध्ये घबराट आहे. त्यात अपूर्ण माहितीच्या आधारे सोशल मिडीयावर बातम्या पसरत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न 
करीत आहे. सर्वांनी जनजागृती व प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. 

अफवांवर विश्‍वास ठेवू नका ! 
अफवांवर नागरिकांनी घाबरून न जाता जागरूकता बाळगावी. लॉक डाऊनचे पालन करावे, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, विनाकारण रस्त्यावर फिरू नये, त्याचबरोबर तोंडाला मास्क किंवा रुमाल लावावा, दिवसातून किमान चार-पाच वेळा हात स्वच्छ साबणाने धुवावे, कोणीही अफवा पसरवू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Samples of the "swap" of those three dead were sent to the investigation!