दारू तुटवड्यावर मध्यप्रदेशातून तस्करीचा उतारा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

सर्वाधिक चालणारे कुठल्याच ब्रॅण्डची विस्की, रम, बिअर असो की, थेट टॅंगो पंच ही देशी दारू असो मालच उपलब्ध नसल्याने जास्तीचे पैसे देऊनही तळीरामांना हवे ते ब्रॅण्ड मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी तस्करीच्या मार्गाने मध्यप्रदेशातील दारू जळगावात मोठ्या प्रमाणावर विक्रीला आली आहे.

जळगाव : "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर बारा दिवसांपासून आस्थापना बंद आहेत. जनता कर्फ्यूनंतर लॉकडाउनचा काळ वाढल्याने ब्लॅकमध्ये दारू विकणाऱ्यांचे साठेही संपायला आले आहेत. अगदी दीडशे रुपयांची मॅक्‍डॉल व्हिस्की साडेचारशे रुपयांत विक्री होत आहे. सर्वाधिक चालणारे कुठल्याच ब्रॅण्डची विस्की, रम, बिअर असो की, थेट टॅंगो पंच ही देशी दारू असो मालच उपलब्ध नसल्याने जास्तीचे पैसे देऊनही तळीरामांना हवे ते ब्रॅण्ड मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी तस्करीच्या मार्गाने मध्यप्रदेशातील दारू जळगावात मोठ्या प्रमाणावर विक्रीला आली आहे. 
राष्ट्रीय आपत्ती म्हणून कोरोनाकडे बघितले जात आहे. देशभरात शेकडो नागरिकांना लागण झाली आहे. अशा परिस्थितीत 20 मार्चपासून जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू झाले. तद्‌नंतर थेट कर्फ्यू आणि संचारबंदीचे आदेश पारीत होऊन तब्बल 12 दिवसांपासून शहरात संचारबंदी लागू आहे. संचारबंदीच्या काळात अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व अस्थापना बंद असून दारू दुकाने बारा दिवसांपासून बंद असल्याने तळीरामांची पंचाईत झाली आहे. दारूची दुकाने बिअरबार बंदचे आदेश पारित होताना रात्री उशिरापर्यंत मिळेल तो, ब्रॅण्ड काळाबाजारुंनी साठा करून ठेवला होता. मात्र, त्यांचाही अंदाज चुकल्याने काही दिवसांपूर्वीच त्यांच्याकडील उपलब्ध ब्रॅण्डही संपले आहेत. ज्यांच्याकडे प्रचलित ब्रॅण्डचा माल पडलेला आहे त्यांच्याकडून दुप्पट तिप्पट किंमत वसूल करण्यात येत आहे. 

मध्यप्रदेशातून तस्करी 
लॉकडाउनमुळे जिल्ह्यातील अधिकृत वाईनशॉप, बिअरबार कुलूप बंद आहे, काहींना उत्पादन शुल्क विभागाने सील लावले आहे. तर, काळ्याबाजारात माल नसल्याने वाढती मागणी पाहता, तस्करांना संधीच चालून आली आहे. मध्यप्रदेशातून दारूची मोठी तस्करी होत असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली असून बॉम्बे रम आणि गोवा व्हिस्की नावाचे अनोळखी ब्रॅण्ड मोठ्या प्रमाणावर विक्रीला आले आहे. 
 
असे ब्रॅण्ड अशी किंमत (कंसात काळ्या बाजारात विक्री) 
मॅक्‍डॉल विस्की : 150 रुपये (375 ते 450) 
मॅक्‍डॉल रम : 120 रुपये (250) 
बिअर : 180 रुपये (300) 
आर.सी, व्हिस्की : 220 रुपये (450) 
आर.एस.व्हिस्की : 130 रुपये (300) 
ऑफिर्स चॉईस : 125 रुपये (250) 
आयबी व्हिस्की : 125 रुपये (250) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon sanchar bandi wine tranceport madhya pradesh state