"रात्रीस खेळ चाले'वाळू माफियांचा... शहरात रात्रभर भरधाव ट्रॅक्‍टरचा दणदणाट !

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मे 2020

ळू वाहतुकीची चौकशी का केली जात नाही? याबाबत या वाहतुकीस कोणतेही बंधन नाही. वाळू ही अत्यावश्‍यक सेवेत आहे काय? याचे उत्तर पोलिस आणि प्रशासनानेही देण्याची गरज आहे.

जळगाव  : "कोरोना'मुळे सर्वत्र "लॉकडाउन'आहे. सर्वसामान्य नागरिक बाहेर फिरल्यास त्यांना पोलिसांचा मार बसतो. अगदी सकाळी "मॉर्निंग वॉक'वाल्यानाही बंदी आहे. मात्र, शहरात बंदी नाही ती फक्त वाळू वाहतूकदारांना. रात्रभर या वाळू वाहतुकीचे ट्रॅक्‍टर शहरात दणदणाट करीत फिरत आहेत. अर्थात ही वाहतूक चोरटी आहे काय? याबाबत प्रशासन खुलासा करेल. मात्र, "लॉकडाउन'चे तरी नियम या वाळू वाहतूकदारांना नाहीत काय? हाच प्रश्‍न आहे. 

नक्की वाचा : खडसे समर्थकांचा हल्लाबोल...चंद्रकांतदादा मागे लपलेल्यांची वाक्‍ये बोलू नका...लोक हसतील ! 

शहरानजीक असलेल्या गिरणा नदीतून तसेच आव्हाणे परिसरातून वाळूची वाहतूक करण्यात येत आहे. रात्री दहानंतर या वाळू वाहतुकीस सुरवात होते. ट्रॅक्‍टर दणदणाट करीत शहरातील रस्त्यावरून धावत असतात. पहाटे चारपर्यंत ही वाहतूक सर्रास सुरू असते. विशेष म्हणजे, शहरातील सर्वच भागातील रस्त्यांवर ही वाहतूक सुरू आहे. 

 
प्रशासन झोपलेले 

"लॉकडाउन'मुळे केवळ जीवनावश्‍यक वस्तू वाहतुकीस परवानगी आहे. मग ही वाळू वाहतूक रात्रभर कशी सुरू असते. रात्री एखादे प्रवासी वाहन गेल्यास त्यांची चौकशी होते. मात्र, वाळू वाहतुकीची चौकशी का केली जात नाही? याबाबत या वाहतुकीस कोणतेही बंधन नाही. वाळू ही अत्यावश्‍यक सेवेत आहे काय? याचे उत्तर पोलिस आणि प्रशासनानेही देण्याची गरज आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली असलेले अधिकारी जिल्ह्यातील अकार्यक्षम झाले आहे काय? असा प्रश्‍नही आता नागरिकांकडून उपस्थित होत आहे. 

 क्‍लिक कराःमेहुणबारेच्या शवविच्छेदनाचा विषय जाणार आरोग्य मंत्री राजेश टोपेंकडे ! 

वाळू वाहतूक अधिकृत की चोरी? 
जिल्ह्यातील वाळूसाठ्याच्या लिलावाची मुदत संपलेली आहे. कोणताही नवीन लिलाव झालेला नाही. अशा स्थितीत ही वाळू कशी होतेय असा प्रश्‍न आहे. मात्र, याबाबत प्रशासनाने माहिती घेऊन कारवाई करण्याची गरज आहे. परंतु "लॉकडाउन'मध्ये ही वाहतूक सर्रास कशी होत आहे, याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon sand mafiya all night unligaly Transportation tractor and dumpar