वाळू ठेकेदार जिल्हाधिकाऱ्यांच्या नावावर फाडायेहेत पावती... जमावबंदीत वाळू वाहने सुरूच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

सकाळपासून या ठिकाणावरून वाळू भरून डंपरा मागे डंपर असे राष्ट्रीय महामार्गावरून भुसावळसह इतर परिसरात वाळू वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना अडविले असता जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला परवानगी दिली असल्याने वाळू वाहतूक करीत असल्याचे सांगण्यात आले. 

जळगाव : जिल्हयात संचारबंदी/जमावबंदीचे आदेश असताना वाळू वाहतूकदारांची वाहने सर्रास सुरू आहेत. शहरातून सकाळी आठ ते अकरा दरम्यान पन्नासच्यावर वाळू वाहतूक दारांची वाहने सर्रास वाळू भरून देताना दिसून आली. जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला वाळू वाहतूकीस परवानगी दिली असल्याचे वाळू ठेकदारांनी सांगत अधिकाऱ्यांचीही फसगत केली. 

जिल्ह्यात सर्वच वाळू ठेके बंद आहे. मात्र एका ठेकेदाराला मोहाडी, प्रशासकीय इमारत, निमखेडी येथील वाळू प्रशासकीय कामांसाठी नेण्यासाठी ठेका दिला आहे. असे असले तरी संबंधित वाळू प्रशासकीय कामांसाठी वापर न होता खासगी नागरिकांना दिली जातेय. यामुळेच आज सकाळपासून या ठिकाणावरून वाळू भरून डंपरा मागे डंपर असे राष्ट्रीय महामार्गावरून भुसावळसह इतर परिसरात वाळू वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना अडविले असता जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला परवानगी दिली असल्याने वाळू वाहतूक करीत असल्याचे सांगण्यात आले. 

वस्तू स्थिती वेगळीच 
वास्तविक पाहता जमावबंदीत वाळू वाहतुकीही बंद असायला हवी. मात्र ठेकदार माया जमविण्यासाठी वाळूची वाहतूक शासकीय कामांसाठी न नेता दुसऱ्या ठिकाणीच नेत असल्याचे दिसून येते. 

जिल्हाधिकाऱ्यांचा संताप 
जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांना वाळू वाहने सुरूच असल्याबाबत तुम्हीच परवानगी दिली असे वाळू ठेकेदार सांगताहेत, असे सांगितले असता वाळू वाहतूकदारांना मी परवानगी दिलेली आहे असा आदेश दाखवा. अशी कोणतीही परवानगी दिलेली नाही. असे सांगून संताप व्यक्त केला. आजच सर्व वाहने बंद करीत असल्याचे आदेशही काढत असल्याचे सांगितले. 

पत्र दिले ः तहसिलदार 
प्रशासकीय ठेका असलेल्या ठेकदाराला वाळू वाहतूक बंद करण्याबाबत आजच पत्र दिली असल्याची माहिती तहसिलदार वैशाली हिंगे यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Sand vehicles continue to mobilize

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: