सातपुड्याच्या दुर्गम भागातही पोचली अन्नधान्याची मदत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मे 2020

तालुक्‍यातील सातपुडा पर्वतराजीत आंबापाणी व थोरपाणी या आदिवासी पाड्यातील 150 परिवारांपर्यंत अन्नसामुग्री पोहोचविण्यात आली.

जळगाव  : भरारी फाउंडेशन व वर्धिष्णू सेवेच्या वतीने सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील आंबापाणी आणि थोरपाणी येथील आदिवासी कुटुंबांना 15 दिवसांचे धान्य वाटप करण्यात आले. 

"कोरोना' संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर 24 मार्चपासून देशव्यापी लॉकडाउन सुरू असून, या काळात गरीब, कष्टकरी, गरजू कुटुंबांना काही दिवसांचे धान्यवाटप करण्याचा उपक्रम के. के. कॅन्सचे संचालक रजनीकांत कोठारी यांच्या पुढाकाराने सुरू आहे. या उपक्रमात आजपर्यंत पंधराशे परिवारांना किमान 15 दिवस पुरेल एवढे अन्नसाहित्य वाटप करण्यात आले आहे. 

आज यावल तालुक्‍यातील सातपुडा पर्वतराजीत आंबापाणी व थोरपाणी या आदिवासी पाड्यातील 150 परिवारांपर्यंत अन्नसामुग्री पोहोचविण्यात आली. कृषी अधिकारी अनिल भोकरे, सुभाष राऊत, डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, प्रशांत पाटील, मयूर चौधरी, डॉ. सुभाष पवार, अजय पाटील आदींचेही या उपक्रमासाठी सहकार्य मिळत आहे. भरारीचे दीपक परदेशी, अद्वैत दंडवते, चेतन पाटील, गुलाब तडवी यांनी आदिवासी परिवारंपर्यंत ही सामग्री पोहचवली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon satpudda areas Reached food help