जळगावात पून्हा सहा कोरोना बाधित रूग्णांचे पॉझीटिव्ह रिपोर्ट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 मे 2020

शहरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांची संख्या वाढत आहे. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या सहाही व्यक्ती या जळगाव शहरातील असून यामध्ये 4 पुरुष तर 2 महिलांचा समावेश आहे.

जळगाव : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या 40 कोरोना संशयित रुग्णांचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 34 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून सहा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. 

शहरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांची संख्या वाढत आहे. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या सहाही व्यक्ती या जळगाव शहरातील असून यामध्ये 4 पुरुष तर 2 महिलांचा समावेश आहे. यात शाहूनगर येथील 10 वर्षीय मुलगा व 24 वर्षाचा तरुण, आदर्शनगर येथील 22 वर्षीय तरुण, समर्थ कॉलनीतील 30 वर्षाचा पुरुष तर रेल्वेलाईन पवननगर येथील 30 वर्षीय महिला व हरिविठ्ठल नगरातील 38 वर्षीय महिलेचा समावेश आहे. 

द्विशतकाच्या उंबरठ्यावर 
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 199 इतकी झाली असून त्यापैकी एकोणतीस व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत तर पंचवीस कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon six corona patiant report pasitive