समायोजित शिक्षकांची दिवाळी अंधारात! 

संजयसिंग चव्हाण
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

भुसावळ : जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात जिल्ह्यातील पालिका व महापालिकेतील साठ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये केले. मात्र, त्यांचे वेतन नेमके कुठून केले जाईल? याबाबत कोणतेही आदेश न दिल्याने गेल्या दोन महिन्यांपासून हे समायोजित शिक्षक वेतनापासून वंचित आहेत. त्यामुळे दसरा व दिवाळी त्यांची अंधारात जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

भुसावळ : जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात जिल्ह्यातील पालिका व महापालिकेतील साठ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये केले. मात्र, त्यांचे वेतन नेमके कुठून केले जाईल? याबाबत कोणतेही आदेश न दिल्याने गेल्या दोन महिन्यांपासून हे समायोजित शिक्षक वेतनापासून वंचित आहेत. त्यामुळे दसरा व दिवाळी त्यांची अंधारात जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

महापालिका व पालिका शाळांमधील विद्यार्थिसंख्येत गेल्या काही वर्षांपासून घट झाल्याने शिक्षक अतिरिक्त होत गेले. या शिक्षकांचे त्या-त्या वर्षात समायोजन न झाल्याने दरवर्षी अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढत गेली. गेल्या पाच ते सहा वर्षांत अतिरिक्त ठरलेल्या महापालिका व पालिका माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना समायोजन बदली करण्यासंदर्भात जिल्हा परिषदेत ठराव करण्यात आला. त्यानंतर आचारसंहितेची अडचण लक्षात घेऊन ताबडतोब समायोजन प्रक्रिया राबविण्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ठरविले. त्यानुसार ही प्रक्रिया फक्त तीन तासांत उरकण्यात आली. अतिरिक्त शिक्षकांना सोयीची गावे न देता, गैरसोयीची गावे देण्यात आली. त्यामुळे अनेक किलोमीटरचा प्रवास करून रोज अतिरिक्त शिक्षक आपले काम करीत आहेत. मात्र, त्यांना समायोजन बदली करताना देण्यात आलेल्या पत्रात वेतनास संरक्षण राहील, असे म्हटले; परंतु हे वेतन नेमके कुठून केले जाईल? यासंदर्भात उल्लेख नाही. त्यामुळे ज्या शाळेतून शिक्षक अतिरिक्त झाले, ती आणि ज्या शाळेत रुजू झाले, त्या शाळेला याची कल्पना नाही. त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांची पगार बिले रखडली आहेत. पुढील महिन्याच्या वेतनाबाबतही कोणत्याच प्रकारची सूचना देण्यात न आल्याने भविष्यातही ही अडचण तशीच राहील, अशी चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे आगामी दसरा व दिवाळी हे दोन्ही सण अतिरिक्त शिक्षकांना पगाराविना जाणार आहेत. 

भुसावळ येथून बत्तीस शिक्षक! 
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून भुसावळ पालिका संचलित डी. एस. हायस्कूल व मुनिसिपल हायस्कूल या शाळांमधील विद्यार्थिसंख्या कमी झाल्याने दरवर्षी दोन-दोन, तीन-तीन शिक्षक दोन्ही शाळांमधून अतिरिक्त होत गेले. मात्र, शासनाने याकडे दुर्लक्ष करून त्यांचे समायोजन त्या-त्या वर्षात न केल्याने २०१९ पर्यंत हा आकडा ३२ पर्यंत पोचला. दोन्ही शाळांमधून सुमारे ३२ शिक्षक अतिरिक्त झाले असून, त्यांना भुसावळसह इतर तालुक्यांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये वर्ग करण्यात आले आहेत. त्यांच्याही वेतनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon teacher paiment diwali