esakal | चोरीसाठी आले...अन्‌ घर पेटवून गेले 

बोलून बातमी शोधा

null

घर बंद असताना चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने पार्टिशनच्या फळ्याकाढून घरात प्रवेश केला. आत काहीही मिळून न आल्याने चोरट्यांनी आग लागून पोबारा केला.

चोरीसाठी आले...अन्‌ घर पेटवून गेले 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील रामेश्‍वर कॉलनीत नागसेन नगर परिसरातील वृद्ध दांपत्य बाहेरगावी गेले असता, त्यांचे बंद घरात चोरीच्या उद्देशाने पार्टिशनच्या फळ्याकाढून चोरटे घरात शिरले काही मिळून न आल्याने चोरट्यांनीच आग लावल्याचा संशय व्यक्त होत आहे. एमआयडीसी पोलिसात या प्रकरणी आकस्मिक आगीची नोंद करण्यात आली आहे. 

नक्की वाचा : आले  नैराश्‍य...अन्‌ पोलिस दादाने संपवले आयुष्य ! 
 

रेल्वे आर्मफोर्स मधून सेवानिवृत्त रतन रामू सुरवाडे, पत्नी कमलबाईसह रामेश्‍वर कॉलनीतील नागसेन नगरात वास्तव्यास आहेत. पती-पत्नी काल मूळ गावाकडे गेले होते. घर बंद असताना चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने पार्टिशनच्या फळ्याकाढून घरात प्रवेश केला. आत काहीही मिळून न आल्याने चोरट्यांनी आग लागून पोबारा केला. सकाळी आठला संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्यावर शेजाऱ्यांना घटना कळताच त्यांनी मदतीला धाव घेतली. शक्‍य त्या पद्धतीने पाण्याचा मारा करण्यात आला. अग्नीबंब बोलावण्यात आले होते. अर्ध्यातासात घरातील आग अटोक्‍यात आली. मात्र, तो पर्यंत घरातील अन्नधान्यासह, बिछाना व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. रतन सुरवाडे यांनी दिलेल्या माहितीवरून एमआयडीसी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
 

आर्वजून पहा : सांख्यशास्त्र जनकांच्या तपोभूमीत विद्यार्थ्यांकडून वेदाभ्यास