अरेच्चा...."त्या' बेपत्ता मुली दिल्लीत...आता परतीचा प्रवास ! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 मार्च 2020

तिसऱ्या दिवशी या मुलींचा शोध लागला असून, मुली दिल्लीत असल्याचे खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. जिल्हापेठ पोलिस दिल्ली पोलिसांच्या संपर्कात असून, या दोघा मैत्रिणींचा जळगावच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे.

जळगाव : शहरातील बेंडाळे महाविद्यालयातील अकरावीच्या विद्यार्थिनीसह तिची मैत्रीण बेपत्ता झाल्याची घटना 13 मार्चला उघडकीस आली होती. यासंदर्भात संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. जिल्हा पेठ पोलिसांनी तपासचक्रे फिरवून या मुलींचा शोध घेतला असून, बेपत्ता मुली दिल्लीत आढळून आल्या आहेत. या मुलींना दिल्ली पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन त्यांना जळगावात आणण्यात येत आहे. त्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार असल्याचे निरीक्षक अकबर पटेल यांनी सांगितले. 

नक्की वाचा :   जिल्हाधिकाऱ्यांच्या पुरवठा विभागावर एसीबीचा छापा... महिला कर्मचाऱ्यांसह चौघांना अटक ! 
 

शहरातील रहिवासी विद्यार्थिनी बेंडाळे महाविद्यालयात अकरावीचे शिक्षण घेत आहे. शुक्रवारी (13 मार्च) महाविद्यालयात परीक्षा असल्याने विद्यार्थिनी गल्लीतच राहणाऱ्या मैत्रिणीसमवेत महाविद्यालयात गेली. सकाळी सातपासून गेलेली विद्यार्थिनी परत न आल्याने तिच्या पालकांनी तिच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन चौकशी केली असता मैत्रीणही घरी नसल्याचे समजले होते. पालकांनी जिल्हापेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद केल्यावर मुलींचा युद्धपातळीवर शोध सुरू झाला होता. निरीक्षक अकबर पटेल यांच्यासह पोलिस पथकाने माहितींचे संकलनासह, इतर बाबींची तपासणी सुरू केल्यानंतर तिसऱ्या दिवशी या मुलींचा शोध लागला असून, मुली दिल्लीत असल्याचे खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. जिल्हापेठ पोलिस दिल्ली पोलिसांच्या संपर्कात असून, या दोघा मैत्रिणींचा जळगावच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. या मुलींचा जबाब नोंदवून घेतल्यावरच या प्रकरणाचा उलगडा होणार असल्याचे तपासाधिकाऱ्यांनी सांगितले. 

 आर्वजून पहा : कामगाराचा मुलगा बनला ‘टिकटॉक स्‍टार’... तब्बल...दिड लाख फॉलअर्स !
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon two Missing girls in Delhi Now the return journey