अंतिम वर्षातील 63 हजार विद्यार्थी देणार परीक्षा! 

अमोल महाजन
शुक्रवार, 15 मे 2020

कोरोना'मुळे "लॉकडाउन' करण्यात आले. यामुळे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांतील परीक्षा रखडल्या. "लॉकडाउन'ने भर पडून तब्बल मार्चपासून सर्वच शैक्षणिक कारभार बंद असल्याने मार्च- एप्रिलपासून सुरू होणाऱ्या महाविद्यालयांच्या सर्वच विद्याशाखांच्या वार्षिक परीक्षा थांबविण्यात आल्या होत्या.

जळगाव : राज्यभरातील सर्व विद्यापीठांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेतल्या जातील, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी नुकतीच केली आहे. त्याअनुषंगाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे परीक्षेचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांच्या सर्व शाखानिहाय सुमारे 62 हजार 953 विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. 
"कोरोना'मुळे "लॉकडाउन' करण्यात आले. यामुळे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांतील परीक्षा रखडल्या. "लॉकडाउन'ने भर पडून तब्बल मार्चपासून सर्वच शैक्षणिक कारभार बंद असल्याने मार्च- एप्रिलपासून सुरू होणाऱ्या महाविद्यालयांच्या सर्वच विद्याशाखांच्या वार्षिक परीक्षा थांबविण्यात आल्या होत्या. दिवसेंदिवस विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांबाबत संभ्रम निर्माण होत असल्याचे पाहून शासनाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊन यात फक्त प्रत्येक विद्याशाखेच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांतील अंतिम वर्षातील सुमारे 62 हजार 953 विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. 
"कोरोना' संसर्गाची परिस्थिती पाहून जून किंवा जुलैमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप परीक्षा अर्ज भरलेले नाहीत, त्यांच्यासाठी 23 मेपर्यंत विनाशुल्क ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. यात दोन वर्षे अभ्यासक्रम, तीन वर्षे अभ्यासक्रम, चार वर्षे आणि पाच वर्षे अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत. 

असे आहेत परीक्षा देणारे विद्यार्थी 
- तीन वर्षांचे अभ्यासक्रम ः बीए- 14,393, बीए (एमसीजे)- 8, बीबीए- 241, बीसीए- 747, बी. कॉम.- 7517, बीएमएस- 223, बीएमएस (ई-कॉमर्स)- 135, बीएसडब्ल्यू- 219, बी. एस्सी.- 14,895, बी. एस्सी. (ऍग्रिकल्चर सायन्स)- 38, बी. व्होक.- 72, एमसीए- 276, बीए, एलएल. बी. (VI /X सेमिस्टर)- 733, एकूण विद्यार्थी ः 39,497. 

- दोन वर्षांचे अभ्यासक्रम ः बीएड- 1749, बीएड (स्पेशल)- 17, बीपीएड- 117, एलएल. एम.- 57, एमए- 4125, एमबीए- 1145, एम. कॉम.- 2954, एमएड- 55, एमएफए -26, एमएमएस (कॉम्प्युटर मॅनेजमेंट)- 245, एमएमएस (पर्सनल मॅनेजमेंट)- 17, एमपीएड- 55, एम. फार्म- 203, एमएसडब्ल्यू- 453, एम. एस्सी.- 5225, एम. टेक/एम. ई.- 44, एकूण विद्यार्थी- 16,487. 
 
- चार-पाच वर्षांचे अभ्यासक्रम ः बी. आर्किटेक्‍चर- 14, बीई- 6593, बी. टेक- 157, बी. टेक (कॉस्मे.)- 43, एमसीए (इंटिग्रेड)- 137, एमबीए (इंटिग्रेड)- 25, एकूण विद्यार्थी- 6,969. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon university exam last year student