esakal | वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा 
sakal

बोलून बातमी शोधा

north maharashtra university

परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने घेतल्या जात आहेत. जे विद्यार्थी परीक्षा अर्ज सादर करूनही अपरिहार्य कारणामुळे परीक्षेपासून वंचित राहिले आहेत;

वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : विद्यापीठाच्या सुरु असलेल्या अंतिम वर्ष/अंतिम सत्र (बॅकलॉगसह) परीक्षेपासून विविध कारणाने वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी १८ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत ‘एमसीक्यू’ पॅटर्ननुसार ऑनलाईन परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. 
उन्हाळी २०२० मधील अंतिम वर्ष/अंतिम सत्राच्या बॅकलॉगसह परीक्षा १२ ऑक्टोबरपासून सुरु झाल्या आहेत. या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने घेतल्या जात आहेत. जे विद्यार्थी परीक्षा अर्ज सादर करूनही अपरिहार्य कारणामुळे परीक्षेपासून वंचित राहिले आहेत; अशा सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी १८ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत एमसीक्यु पॅटर्ननुसार फक्त ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात येणार आहेत. 

९२ विषयांच्या परीक्षा
सोमवारी परीक्षेचा अकरावा दिवस होता. दुपारपर्यंत विविध विद्याशाखांच्या ९२ विषयांच्या परीक्षा होत्या. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत झालेल्या परीक्षांच्या विविध सत्रात ३ हजार ६४२ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा यशस्वीपणे दिली तर या सत्रात ७५० विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली. सायंकाळी उशिरापर्यंत परीक्षा सुरु होती.