वाळू वाहतुकदाराचा दुचाकी चोरी "साईड बिझनेस' 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 March 2020

साईड बिझनेस म्हणुन दुचाकी चोरीचा धंदा त्याने सुरु केला होता. जिल्ह्यासह बुलढाणा, मध्यप्रदेशातील इंदौर येथे त्याच्या विरुद्ध तब्बल आठ चोरीचे गुन्हे दाखल असुन अटकेतील संशयीतांकडून इतरही गुन्हे उघड होण्याची शक्‍यता आहे.

जळगाव : मध्यप्रदेशासहीत महाराष्ट्रातील चोपडा,भुसावळ,बीड आदी ठिकाणावरुन चोरी केलेल्या 10 मोटारसायकली गुन्हेशाखेच्या पथकाने गणेश बाबुलाल राजपुत(वय-35,रा.जंगीपुरा ता.जामनेर) याच्या कडून जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे, चोरट्याच्या स्वत:च्या नावे शेती आहे, वाळू डंपरचा तो मालकही आहे. असे असतांना केवळ साईड बिझनेस म्हणुन दुचाकी चोरीचा धंदा त्याने सुरु केला होता. जिल्ह्यासह बुलढाणा, मध्यप्रदेशातील इंदौर येथे त्याच्या विरुद्ध तब्बल आठ चोरीचे गुन्हे दाखल असुन अटकेतील संशयीतांकडून इतरही गुन्हे उघड होण्याची शक्‍यता आहे. 

क्‍लिक करा - करवसुलीसाठी ‘महावितरण’-‘महसूल’मध्ये राडा 

जळगाव शहरासह जिल्ह्यात दिवसाला 7 मोटारसायकली चोरीला जात असुन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी वाहन चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून कालच सात वाहनांसह एकाला गुन्हेशाखेने अटक केलेली असतांना दुसऱ्याच दिवशी जामनेर तालूक्‍यातील जंगीपुरा येथील गणेश बाबुलाल राजपुत याने चोरीची दुचाकी गहाण ठेवुन त्याकडून पैसे घेवुन गेला असल्याची गुप्त माहिती विजय शामराव पाटील यांना भेटली होती. अप्पर अधीक्षक भाग्यश्री नवटके, निरीक्षक बापु रोहोम यांच्या मार्गदर्शनात गुन्हेशाखेचे पथकाला रवाना केल्यावर एका मागून एक दहा मोटारसायकली चोरट्याने काढून दिल्या आहेत. 

हेपण पहा - भोंदूबाबाचा प्रताप...पूजेसाठी बोलावले...मग केली अश्‍लिल व्हिडीओ क्‍लिप!

आठ गुन्हे दाखल 
अटकेतील गणेश राजपुत याच्या विरुद्ध मध्यप्रदेशातील इंदौर, शहरापुर, बोदवड, रावेर, नशिराबाद, जिल्हापेठ, वरणगाव, पहुर अशा आठ ठिकाणी वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे त्याने पोलिस चौकशीत सांगीतले. संशयीताकडून 2 लाख 80 हजारांच्या दहा मोटारसायकली जप्त केल्या आहेत. 

मास्टर की, चा वापर 
गणेश बाबुलाल राजपुत याने विशीष्ट प्रकारची मास्टर "की' तयार करुन घेतली असून प्रत्येक दहा वाहनांपैकी दोन वाहनांना हि चावी लागत असून त्याद्वारे अलगद मोटारसायकल लपांस करुन जळगावची दुचाकी मध्यप्रदेशात, बीड, बुलढाणा जिल्ह्यात तो मिळेल त्या किंमतीत विक्री करीत होता. गावात तीन मोटारसायकली त्याने गहाण ठेवल्याची माहिती मिळाल्यावरुन गुन्हेशाखेने त्यास शोधुन काढत अटक केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon vadu tranceport and two wheeler robbary side business