esakal | भोंदूबाबाचा प्रताप...पूजेसाठी बोलावले...मग केली अश्‍लिल व्हिडीओ क्‍लिप ! 
sakal

बोलून बातमी शोधा

poor woman imege

औरंगाबाद येथे पूजा करण्यासाठी किशोर जोशी यांनी औरंगाबाद येथील एका हॉटेलमध्ये बोलावून कॉफी पिण्यासाठी देऊन अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. 

भोंदूबाबाचा प्रताप...पूजेसाठी बोलावले...मग केली अश्‍लिल व्हिडीओ क्‍लिप ! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव  : कौटुंबिक वादातून होणारा त्रास कमी करण्याच्या बहाण्याने पूजाविधी करणाऱ्या भोंदूने विभक्त विवाहितेचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. पीडितेला जळगावसह मुंबई, दिल्ली, राजस्थान अशा विविध ठिकाणी घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पीडित विवाहिता बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे. पतीसोबत तिचा कौटुंबिक वाद सुरू होता. त्यामुळे जामनेर येथील करणी सेना तालुकाध्यक्ष रतन परदेशी (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याकडून किशोर सटवाजी जोशी- शास्त्री (रा. शिक्षक कॉलनी, जामनेर, ह. मु. कासार मंगल कार्यालयाजवळ, अयोध्यानगर, जळगाव) हे पूजाविधी करून वैवाहिक जीवनातील व्याधी आणि त्रास कमी करत असल्याची माहिती मिळाली. त्यावर विश्‍वास ठेवून डिसेंबर 2018 मध्ये पीडिता जळगावला येऊन परदेशी यांना भेटली. मात्र, ते वर्षच मुळात योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर वर्ष-2019 हे चांगले वर्ष असल्याचे सांगितल्यानंतर 1 जानेवारी 2019 रोजी रात्री नऊला औरंगाबाद येथे पूजा करण्यासाठी किशोर जोशी यांनी औरंगाबाद येथील एका हॉटेलमध्ये बोलावून कॉफी पिण्यासाठी देऊन अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. 

क्‍लिक कराःधक्कादायक..शिक्षणाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी केली तयार...आणि केली शिक्षक भरती ! 
 

क्‍लिप दाखवून "ब्लॅकमेल' 
आपल्यावर केलेल्या अत्याचाराबाबत पीडितेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयित किशोर जोशी याने त्याच रात्री केलेल्या व्हिडिओ क्‍लिप दाखवून व्हायरल करण्याची धमकी दिली. गेल्या दीड दोन वर्षापासून त्या आधारे पीडितेचे शोषण सुरू असल्याचे दाखल गुन्ह्यात नमूद केले आहे. 

नक्की वाचा :  न्यायालयाने केले आश्‍वस्त ... आणि सहा दिवसांनी स्वीकारला मृतदेह 
 

जळगावात घरोबा 
या व्हिडीओच्या आधारे भोंदू किशोर जोशी याने पीडितेला मुंबई, दिल्ली, बीड, जळगाव, इंदूर येथील विविध हॉटेलमध्ये सोबत नेऊन अत्याचार केला. त्यानंतर जळगावातील अयोध्यानगरात भाड्याने खोली घेऊन दोघे गेल्या एक वर्षापासून एकत्र राहत होते. दरम्यान, 9 मार्च 2020 ला नातेवाइकाशी मोबाईलवर बोलल्याचा राग आल्याने किशोर जोशी यांनी पीडित महिलेला मारहाण करून घरातून हाकलून दिले. पीडितेच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसात संशयित किशोर जोशी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक निरीक्षक संदीप हजारे तपास करीत आहे. 

आर्वजून पहा :  अरेच्चा... खराब रस्ते दाखविण्यासाठी..चक्क महापौरांना चालवावी लागली दुचाकी !