मग्रारोहयोच्या विहीरींचा लाभ मिळणार

प्रमोद पवार 
मंगळवार, 13 मार्च 2018

उपोषणकर्त्यांना प्राधान्य देऊन विहीरींना लाभ देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

कजगाव (ता. भडगाव) - महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विहीरी मंजूर असताना तसेच शेतकऱ्यांनी दोन तीन वर्षापासून वर्कऑर्डर देऊनही खोदकाम मात्र रखडलेले असताना दखल घेतली गेली नाही. म्हणून आज उपोषणाचा मार्ग पत्करला. मात्र उपोषणकर्त्यांना प्राधान्य देऊन विहीरींना लाभ देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

याबाबात माहिती अशी की, कजगाव येथील सन 2015-16 ते सन 2016-17 या काळात मग्रारोहयो अंतर्गत शेतकऱ्यांना विहीर खोदकामाला मंजुरी मिळाली होती. याबाबात पंचायत समितीने दि 25 एप्रिल 2016 
कार्यारंभ आदेश देऊन विहीर खोदकाम आदेश दिले होते. मात्र दोन तीन वर्षापासून यांची अंमलबजावणी झालेली नाही. दरम्यान शेतकऱ्यांनी वारंवार संपर्क साधून उडवाउडवीचे उत्तर मिळत होती. त्यामुळे आपल्यावर अन्याय होत असल्याने न्यायासाठी सर्वांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार येथील विलास पाटील, कैलास पाटील, न्यानेश्वर पाटील, प्रकाश पाटील वाल्मीक बोरसे, नकुबाई पंढरीनाथ बोरसे, मथुराबाई पवार, जिजाबाई पाटील साहेबराव पाटील सुधाकर पाटील मंगलसिंग पाटील, नारायण महाजन आदी शेतकऱ्यांनी आज दुुुपारी बारा पासून भडगाव तहसिल कार्यालयाच्या आवारात उपोषणाला सुरू केले. 

अधिकाऱ्यांचे आश्नासन : शेतकरी उपोषणाला बसल्याचे समजताच गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी शेतकऱ्यांनी पंचायत समितीच्या कारभार वर ताशेरे ओढले. यावेळी दोन तीन वर्षापासून कार्यारंभ दिला असताना कामे का चालू झाली नाहीत?
असा प्रश्न केला तेव्हा मागील काळात काय झालं मला माहिती मी आताच रूजू झाले आहे तरी या प्रकरणी कोण दोषी आहे यांची चौकशी करून कारवाई करणार असे सांगितले तसेच पुढील शासनाच्या विहीर खोदकाम योजनेत उपोषणकर्तांना प्राधान्य दिले जाणार असे लेखी आश्वासित करून लिंबू सरबत देऊन सायंकाळी सहा वाजता गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी उपोषण सोडले. यावेळी तहसिलदार सी एम वाघ, विस्तार अधिकारी टी पी मोरे छावा संघटनेचे लालसिंग राजपूत, महेद्र पाटील, दिनेश पाटील, माजी सभापती एकनाथ महाजन राजेंद्र पाटील, निलेश पवार, अनिल महाजन, गौरव पवार, नरेश पाटील, गोरख पाटील, बबडू पाटील सुनिल पाटील, आंचळगाव सरपंच विद्याधर पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार, हर्षल पाटील सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Web Title: marathi news jalgaon well scheme employment scheme strike