गव्हाच्या दरात तब्बल सातशे रुपयांची वाढ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

सध्या गव्हाच्या दर तेजीत आहे. नवीन गव्हाची आवक सुरू झाल्यानंतरच दर कमी होतील. नवीन गहू बाजारात मार्चनंतर येईल. 2150 ते 2300 दरम्यान त्याचा दर असेल. 
- विजय वाणी, व्यापारी 

जळगाव : रब्बीचा हंगाम आता सुरू झाला आहे. यंदा रब्बीत शेतकऱ्यांचे पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी गव्हाची पेरणी अधिक करीत आहे. यामुळे गव्हाचे उत्पादन अधिक होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. असे असले तर सध्या गव्हाच्या दरात सहाशे ते सातशे रुपयांची प्रति क्विंटल वाढ झाली आहे. ही वाढ सर्वसामान्यांना महागाईचे चटके लावणार आहे.

क्‍लिक करा - शहरात आठ केंद्रावर 26 जानेवारीपासून "शिवभोजन' 

दिवाळीत पावसाने धुमाकूळ घालत खरिपाचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. यामुळे मका, ज्वारी, भुईमूग, उडीद, मुगाचे उत्पादन अत्यल्प झाले. ज्वारी काळी पडली ती बाजारपेठेतही विकली गेली नाही. त्याच वेळेपासून गव्हाच्या दरात वाढ होत गेली. आज "लोकवन' व "वनफोरसेव्हन' गव्हाचा दर प्रतिक्विंटल 2850 ते 3000 असा आहे. जो 2150 ते 2250 दरम्यान दिवाळीपूर्वी होता. चंदोसी गहू 3800 ते 4200 दरम्यान आहे. पंजाब, मध्यप्रदेशातील जुन्या गव्हाची आवक सुरू आहे. नवीन गहू येण्याअगोदर जुन्या गव्हाच्या दरात वाढ होते. ती यंदा अधिक वाढ असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 

तूर, चणाडाळीचे दर कमी होणार 
नवीन चणाडाळीचे सध्याचे दर 55 रुपये प्रतिकिलो, तूर डाळीचे दर सध्या 82 ते 83 दरम्यान आहे. आगामी दीड महिन्यात या डाळीची आवक अधिक होण्याची शक्‍यता आहे. यामुळे चणाडाळ 50 रुपये तर तूरडाळ 70 रुपयांपर्यंत खाली येईल, असा अंदाज आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Wheat rate high market