शहरात आठ केंद्रांवर २६ जानेवारीपासून 'शिवभोजन' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

जळगावः राज्यात महाविकास आघाडीच्या शासनातर्फे २६ जानेवारीपासून दहा रूपयांत शिवभोजन योजन सुरू होणार आहे. त्यासाठी शहराता आठ ठिकाणी केंद्रे निश्चीत करण्यात आली आहेत. केंद्रचालकांना जिल्हा पुरवठा विभागातर्फे प्रशिक्षण देण्यात आले. २६ जानेवारीपासून ही केंद्रे कार्यान्वित करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार केंद्रचालकांनी योजना कार्यान्वित करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. आठ केंद्रांवर प्रत्येकी ७५ थाळ्या देण्याचे तूर्त नियोजन आहे. 

केंद्र सुरू करण्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी आज संबंधित केंद्र चालकांचे प्रशिक्षण घेतले. त्यात शिवभोजन देण्याचा परिसर स्वच्छ असावा. नागरिकांना तेथे बसण्यासाठी बसण्याची जागा असावी. भोजनालयातील सुका व ओला कचरा वेगवेगळा काढावा. परिसरात डास, किटाणू नकोत. दहा रूपयात भोजन देण्यात यावे आदी सूचना देण्यात आल्या.

हे वाचा- पोपटराव सोनवणे राष्ट्रवादीत?​

‘शिवभोजन’  योजनेअंतरेगत शहरात आठ ठिकाणी केंद्रे निश्चित करण्यात आली. केंद्रचालकांना त्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. २६ जानेवारीपासून ही केंद्रे सुरू करण्यात येतील. –सुनील सुर्यवंशी

सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी, ए. पी. जोशी, पुरवठा तपासणी अधिकारी ब्राम्हणकर, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त बेंडकुळे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी विकास पाटील उपस्थित होते. सोबत भोजनालयावर नियंत्र ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. अन्नाचा दर्जा उत्तम कसा असावा, भोजनात पोषक तत्वे असलेल्या निवड करावी, स्वच्छता राहण्याबाबत अधिक मार्गदर्शन करण्याबाबत अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight Shivbhojav Centers will be opened in Jalgaon

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: