डोळ्यांच्या हालचालींवर चालणारी "व्हीलचेअर' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

जळगाव : अपंग, अर्धांगवायू झालेल्या रुग्णांना खुर्चीवर बसून फिरता यावे, यासाठी केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी "आय डायरेक्‍टर व्हील चेअर'ची निर्मिती केली आहे. अपंग व्यक्तीच्या डोळ्यांच्या हालचालींवर ही व्हीलचेअर चालू शकते, असे हे संशोधन असून या विद्यार्थिनींनी ते विख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांना समर्पित केले आहे. 

केसीई सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्‍ट्रॉनिक्‍स ऍण्ड टेलिकम्युनिकेशनच्या विद्यार्थिनी मीनल फेगडे, अंकिता जगदाळे, मोहिनी पाटील, निधी महाजन यांनी हा अनोखा प्रयोग साकारला आहे. त्यांना प्राचार्य डॉ. के. पी. राणे, प्रा. संजय पावडे, संजय सुगंधी, विजयकुमार सोनवणे, गजानन पाखरे, विभागप्रमुख स्वप्नील पाटील, राहुल पटेल यांचे मार्गदर्शन लाभले. 

तंत्रज्ञानाचा उपयोग मानवी जीवनाच्या कल्याणासाठी केला तरच तंत्रज्ञान आपल्यासाठी देणगी ठरू शकते. याच भावनेतून या विद्यार्थिनींनी ही चेअर बनवली असून, नुकतेच दिवंगत झालेले विख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या प्रेरणेतून केलेले हे संशोधन त्यांनाच समर्पित केल्याचे या विद्यार्थिनी सांगतात. 

चेअर असे करते काम.. 
या व्हीलचेअरमध्ये ऑप्टिकल टाइन आय ट्रॅकिंग सिस्टिमचा वापर करण्यात आला आहे. ज्यावेळी ही चेअर वापर करणारी व्यक्ती कॅमेरा लावलेला गॉगल घालेल त्यावेळी कॅमेरा डोळ्यांच्या हालचाली कैद करतो व ती कमांड कॉम्प्युटर सॉफ्टवेअरला देतो. त्यामुळे चेअरवरील व्यक्ती जिकडे बघेल, त्या दिशेने चेअर फिरते. चेअर वापरणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी त्यात अल्ट्रासॉनिक सेन्सॉर लावलेला असून आपत्कालीन स्थितीत थांबण्यासाठी स्वतंत्र बटन देण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon wheelchear