मोबाईल क्रमांक न दिल्याने चौघांकडून मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

जळगाव : शहरातील पिंप्राळा मढी चौकात रविवारी रात्री तरुणावर चौघांनी चॉपर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली. ओळखीच्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक दिला नाही म्हणून वाद झाला. दरम्यान, जखमी नीतेश मिलिंद जाधव (वय 24) याला खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. 

जळगाव : शहरातील पिंप्राळा मढी चौकात रविवारी रात्री तरुणावर चौघांनी चॉपर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली. ओळखीच्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक दिला नाही म्हणून वाद झाला. दरम्यान, जखमी नीतेश मिलिंद जाधव (वय 24) याला खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. 
मढी चौकात नीतेश जाधव कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. रविवारी रात्री नऊच्या सुमारास नीतेश घराजवळच व्यायामाच्या जागेवर बसलेला असताना गोलू धनगर व गोलू गुर्जर असे दोघेही त्याच्याजवळ आले. "मला सुपडू ठाकूरचा मोबाईल नंबर देत', असे म्हटल्यावर नीतेशने नंबर देण्यास नकार दिल्याने वादाची ठिणगी पडली. दोघांनी नीतेशला बेदम मारहाण केली व तेथून पळ काढला. अर्ध्या तासात परत गोलू धनगर हा त्याचा मित्र विशाल कोळी, अक्षय ऊर्फ बाब्या धोबी, दूध फेडरेशनकडे राहणारा गोलू असे चौघेही परत आले. चौघांनी पुन्हा मारहाण करण्यास सुरवात करून अक्षयच्या गाडीतून विशालने चॉपर काढून नीतेशच्या पाठीवर सपासप वार करून जखमी केले. त्यानंतर गोलू धनगर याने डोक्‍यात फरशी मारली. तसेच चौघांनी जखमांवर लाथांनी चिरडून आरोळ्या मारण्यास सांगत आज "तुला मारून टाकू' असे म्हणत बेशुद्धावस्थेत सोडून पळ काढला. परिसरातील नागरिकांनी कुटुंबीयांना कळविल्यावर नीतेशला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात जाऊन पोलिस नाईक विनोद सोनवणे यांनी जखमीचा जबाब नोंदविल्यावरुन चौघांविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार गोपाल चौधरी तपास करीत आहेत. 

एकास अटक 
पाठीत चॉपरने वार करून आणि डोक्‍यात फरशी मारल्यानंतरही चौघा संशयितांनी जखमी नीतेश जाधव याला त्याच जखमांवर पुन्हा मारले. जखमीच्या जबाबावरून दाखल गुन्ह्यात पोलिसांनी अक्षय ऊर्फ बाब्या धोबी यास अटक केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon young boy hetting mobile nomber another boys group