पोलिसांचे आठ पथक... त्याच्या शोधात विदर्भ काढला पिंजून...अन्‌ अखेर तो सापडला नाशिकमधे ! 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

पोलिसांनी अटक केलेला आरोपी अत्यंत चालाख असल्याने राज्यभरात विविध गुन्हे दाखल आहे. चोरी, फसवणूक, विनयभंग, विश्वासघात, मुली व महिला पळून नेने अशा स्वरुपाचे सुमारे 15 गुन्हे विविध ठिकाणी दाखल आहे.

जळगाव : शहरातून आपल्या गावी परतणाऱ्या परप्रांतीय अल्पवयीन मुलीस मोटारसायकलवर बसवून पळवून नेणाऱ्या गणेश सखाराम बांगर या आरोपीस नाशिकरोड पोलिसांनी अटक केली. या ठगास अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे आठ पथक तयार करण्यात आले होते. हा आरोपी हातावर तुरी देवून पसार होण्यात माहीर असल्याने अनेक वेळा तो पोलिसांच्या तावडीतून देखील पसार झाला असून त्याच्यावर विविध प्रकारचे पंधरा गुन्हे दाखल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

वाशीत जिल्ह्यातील मालेगाव तालुक्‍यातील गणेश सखाराम बांगर याने शहरातील कालिंका मंदिरापासून अल्पवयीन मुलीससह तीच्या भावाला एमएच 37 वाय 1947 क्रमांकाच्या मोटारसायलवर बसवून घेवून गेला होता. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत गेल्यानंतर त्याने पिडीत मुलीच्या भावाला उतरवून पिडीत मुलीचे अपहरण करुन पळून गेला होता. याप्रकरणी नशिराबादपोलिसात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले व अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी गुन्हा दाखल झाले बरोबर सर्व पोलिस यंत्रणेला कामाला लावून भुसावळ ते अकोला पावेतो तात्काळ नाकाबंदी लावण्यात आली होती. ता. 20 रोजी अपहरण झालेली मुलगी अमरावती ग्रामीण लोणी पोलिस ठाण्याच्या परसरात सुखरुप मिळून आली होती. 

आरोपीच्या शोधात पथकांनी विदर्भ काढला पिंजून 
आरोपीच्या शोधासाठी पोलिस अधिक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलिस अधिक्षक भाग्यश्री नवटके, भुसावळ डिवायएसपी गजानन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचे आठ पथक तयार करण्यता आले होते. वाशीम, मालेगाव, कारंजा-लाड, मंगरूळ पीर, अकोला, मूर्तिजापूर, अमरावती याठिकाणी तपास करीत होते. 

आरोपीवर राज्यभरात 15 गुन्हे दाखल 
पोलिसांनी अटक केलेला आरोपी अत्यंत चालाख असल्याने राज्यभरात विविध गुन्हे दाखल आहे. चोरी, फसवणूक, विनयभंग, विश्वासघात, मुली व महिला पळून नेने अशा स्वरुपाचे सुमारे 15 गुन्हे विविध ठिकाणी दाखल आहे. तसेच या आरोपीला दोन गुन्ह्यांमध्ये शिक्षा देखील झालेली आहे. 
सदाराखाली गुन्हे दाखल आहेत . 

गुन्ह्यांचा अभ्यास करुन केली अटक 
पोलिसांनी आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याच्याबाबतची संपूर्ण माहिती संकलीत केली. तसेच त्याची गुन्हे करण्याची पद्धतीचा अभ्यास करुन अखेर आज त्याला नाशिक शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली त्या आरोपीच्या मुसक्‍या आवळल्या. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon yung girl kidnapper arrested by police