जन्मदात्याच्या शाळेला मुलाची अनोखी भेट

school computer gift
school computer gift

फत्तेपूर (ता. जामनेर) : आजच्या धावपळीच्या युगात ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेला भेट देणे सोडाच, मदत देखील कुणी करत नाही. मात्र, ज्या शाळेत आपल्या वडिलांनी शिक्षण घेत, मुंबई सारख्या महानगरात पोलिस निरिक्षक पदावर कार्यरत आहेत. त्या शाळेप्रती कृतज्ञता म्हणून मुलानेच आपल्या बाबांच्या शाळेस पाच संगणक संच भेट म्हणून द्यावेत, हा दुर्मिळ योग आहे. हे महाभाग्य लाभले पळासखेडा काकर (ता. जामनेर) येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेस.

जामनेर तालुक्यातील दक्षिण पूर्व भागातील शेवटच्या टोकावर पळासखेडा काकर येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. गटग्रामपंचायत देऊळगाव गुजरी ग्रामपंचायतमधील हे गाव आहे. या शाळेत तीन शिक्षक सेवेत असून, अशोक गबरु राठोड यांनी शिक्षण घेतले आहे. पुढील शिक्षणानंतर ते पोलिस खात्यात नोकरीस लागून मुंबईत स्थायिक झाले. त्यांचा मुलगा नरेंद्र हा देखील मुंबईत शिकून, महेंद्र टेक कंपनीत नोकरीस लागला.

वडिलांच्या शाळेच्या शैक्षणिक गप्पांमधून प्राथमिक शाळा किती महत्वाची त्यास कळले. या शाळेप्रती कृतज्ञता म्हणून त्याने वडिलांच्या शाळेस पाच संगणक ज्या कंपनीत कामाला लागला त्या कंपनीकडून मिळवून दिले. संगणक कक्षास स्वखर्चाने रंगरंगोटी, फर्निचर करुन दिले. संगणक कक्षाचे उद्घाटन वडिलांचेच हस्ते करण्यात आले. या शाळेच्या वैभवात भर घालणारा कार्यक्रम नुकताच पार पडला. प्रसंगी सरपंच जोगिंदरसिंह, उपसरपंच मदन राठोड, पोलिसपाटील राजू राठोड, ज्येष्ठ नागरिक शिवराम राठोड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलदार तडवी, ग्रामपंचायत सदस्य नवलसिंग राठोड, बाबू राठोड, अमरसिंग राठोड, स्वरुपसिंग रुढे, सुदाम राठोड, राजाराम राठोड, अरुण राठोड, शिक्षणप्रेमी विकास चव्हाण, नसिर जांभूळकर, महारु राठोड, नामदार तडवी उपस्थित हाते. कार्यकमात शरद भोई यांनी सूत्रसंचालन तर विलास बेदारे यांनी प्रास्ताविक केले. अनिल वाघ यांनी आभार मानले.

मदतीचा ओघ वाढला
ग्रामपंचायतीने शाळेस प्रिंटर, पाण्याची टाकी बसवून पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली. रामदेव बाबा मंदिर समितीने शाळेतील एका वर्गखोलीस फरशी बसवून दिली. कार्यक्रमात नरेंद्र राठोड, त्यांचे वडिल अशोक राठोड, उपसरपंच मदन राठोड, रामदेव बाबा मंदिर समिती अध्यक्ष व विश्वस्त यांचा सत्कार करण्यात आला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com