Video दारुबंदीसाठी रणरागिणींचा एल्गार; हातभट्ट्या उध्द्वस्त

women wine stop
women wine stop

तळेगाव (ता. जामनेर) : जळादी बुद्रूक (ता. जामनेर) येथे गावठी हातभट्टीची दारु सर्रासपणे विक्री केली जाते. त्यामुळे गावातील रणरागिणींनी दारुच्या हातभट्ट्या उध्वस्त केल्या. यामुळे दारु विक्रेत्यांनी महिलांना जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने प्रजासत्ताक दिनी संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत, गावात दारुबंदीसह अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली. याची दखल घेत, पोलिसांनी गावठी दारु अड्यांवर कारवाई केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

गावात हातभट्टीची दारुची सर्रासपणे विक्री केली जाते, त्यामुळे तरुण पिढी व्यवसनाधीन होत आहे. यांसदर्भात पोलिसांत वारंवार तक्रार करुन देखील दखल घेतली जात नसल्यामुळे संतप्त महिलांनी शनिवारी (ता. २५) दारु विक्रेत्यांच्या घरात घुसुन दारु नष्ट केली. तर जंगलात जाऊन हातभट्या सुध्दा नष्ट केल्या. त्यामुळे दारु विक्रेत्यांनी महिलांना शिवीगाळ करुन चोरीचा आरोप करीत, जिवे मारण्याची धमकी दिली. यामुळे महिलांचा आणखी उद्रेक होऊन प्रजासत्ताक दिनी ग्रामसभेत गावातील महिलांनी ठिय्या आंदोलन केले. 

महिलांची घोषणाबाजी
गावात दारु बंदी झालीच पाहिजे, सट्टा बंदी झालीच पाहिजे, पत्ता बंदी झालीच पाहिजे अशा घोषणांनी ग्रामपंचायत परिसर दणाणून गेला. अखेर सरपंच चांगदेव पाटील यांनी पहुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक परदेशी यांना दूरध्वनीवरुन माहिती दिली. श्री. परदेशी यांनी गावात येऊन महिलांशी संवाद साधला, तसेच गावात दारुबंदी करुन, विक्रेत्यांवर कारवाईचे आश्‍वासन दिले. पोलिस प्रशासनास दिलेल्या निवेदनावर अश्‍विन पाटील, सुवर्णा किरोते, विजया पाटील, सरला पारधी, जयक्षी उबाळे, प्रतिभा पाटील, दिपाली पाटील आदी महिलांच्या सह्या आहेत.

दारु विक्रेंत्यांना दिली समज
पोलिसांनी दारु विक्रेता रवींद्र रंगनाथ पारधी, सिताराम आंनदा पारधी, गौतम अशोक म्हसके, बाबूराव सुखदेव नेटके, दिनेश गणेश म्हस्के, जळांद्री खुर्द चे पोलिसपाटील भिमराव सुरवाडे यांचा मुलगा विनोद सुरवाडे, विजय चांगो पारधी यांच्या घरी जाऊन झडती घेत, समज दिली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com