esakal | व्यवसायिकांमध्ये शुध्द पाणी देण्याची स्पर्धा, आणि कापडणेकरांना मिळतय पाच रुपयात वीस लिटर पाणी 
sakal

बोलून बातमी शोधा

व्यवसायिकांमध्ये शुध्द पाणी देण्याची स्पर्धा, आणि कापडणेकरांना मिळतय पाच रुपयात वीस लिटर पाणी 

ग्रामपंचायतचे पाचमध्ये वीस उपलब्ध झाल्याने इतरांचे दर कमी होवू लागले आहेत. वाढत्या स्पर्धेमुळे कापडणेकरांना स्वस्तात पाणी मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

व्यवसायिकांमध्ये शुध्द पाणी देण्याची स्पर्धा, आणि कापडणेकरांना मिळतय पाच रुपयात वीस लिटर पाणी 

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे  : येथे आरओचे जल शुध्दीकरण केंद्र तीन होते. अाता ग्राम पंचायतीने सोळा लाखाचे जम्बो जलशुध्दीकरण सुरु केले. पाच मध्ये वीस लिटर पाणी देण्यास सुरुवात केली आहे. इतर तिघा केंद्राच्या मालकांनी घरपोच दहामध्ये वीस लिटर पाण्याची सेवा सुरु केली आहे. तर लवकरच केंद्रांतही पाचमध्ये वीस लिटर पाण्याची उपलब्धता करुन देणार आहेत. एका केंद्राचालकाने यंत्रात काॅईन टाकून पाणी पुरवणारी फिरती गाडी सुरु केली आहे. या वाढत्या स्पर्धेने ग्रामस्थांना स्वस्तात पाणी उपलब्ध होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

सोळा लाखाचे केंद्र पडले होते धुळे खात
ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगातून सोळा लाखाचे जलशुध्दीकरण केंद्र सहा महिन्यांपुर्वीच उभारले आहे. त्याचे उद्धाटन दोन महिन्यांपुर्वी झाले. प्रत्यक्ष सुरु होण्यास अधिक मासचा मुहुर्त सापडला. त्यासाठी प्रशासक टी.के. तिवारी यांची भूमिका महत्वपुर्ण ठरली. या केंद्रातून पाचमध्ये वीस लिटर पाणी उपलब्ध झाले आहे.

पंचायतीचे जलशुध्दीकरण सुरु होताच वाढली स्पर्धा
येथे महादेव, राम व बेस्ट असे तीन जलशुध्दीकरण केंद्र आहेत. त्यांच्याकडून वीसमध्ये वीस लिटर घरपोच पाणी पुरविले जात होते. आता ग्रामपंचायतचे पाचमध्ये वीस उपलब्ध झाल्याने इतरांचे दर कमी होवू लागले आहेत. वाढत्या स्पर्धेमुळे कापडणेकरांना स्वस्तात पाणी मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

इच्छुक उमेदवार देणार मोफत जार ?
एक राजकिय महत्वाकांक्षी पाचवे केंद्र सुरु करणार आहे. ते घरपोच पाचमध्ये वीस लिटर पाणी पुरविणार आहे. तर ग्रामपंचायतीसाठी इच्छुक दोन उमेदवार प्रभागातील प्रत्येक घरी मोफत वीस लिटरचा जार अधिक मासचा जार मोफत वितरीत करणार आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image