esakal | खानदेशातील हिमोफिलिया रुग्णांची धुळे शहरातच सुविधा
sakal

बोलून बातमी शोधा

Haemophilia

खानदेशातील हिमोफिलिया रुग्णांची धुळे शहरातच सुविधा

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे : सतरा एप्रिल हा जागतिक हिमोफिलिया दिवस आहे. या दिवसाचे निमित्त साधत आजपासून धुळे शहरातच हिमोफिलीया उपचार केंद्र तथा एचटीसी सुरु झाले आहे. हिमोफिलिया रूग्णांना महागडे दहा ते पंधरा हजाराचे फॅक्टर इंजेक्शन अगदी मोफत मिळणार आहे. खानदेशातील धुळेसह नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील रूग्णांची मोठी सोय झाली आहे. यापुर्वी नाशिक येथील जिल्हा रूग्णालयात जावे लागत होते. विजयदीप हॉस्पिटलमधीलसेंटरशी संपर्क करण्याचे आवाहन सोसायटीचे सचिव स्वप्नील पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा: केरळी कुटूंबीयांनी.. गड्या आपले गाव बरे म्हणत सोडले शहर

17 एप्रिल जागतिक हिमोफिलिया दिवस

हिमोफिलिया आणि इतर रक्तस्त्राव विकारांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी जागतिक हिमोफिलिया दिवसाची सुरुवात 1989 मध्ये वर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफिलियाने (डब्ल्यूएफएच) सुरू केली होती. लोकांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात जागरूकता वाढावी. एकही रुग्ण इलाज विना राहू नये. रुग्णांना चांगले उपचार मिळावा, हा हेतू आहे. हिमोफेलिया हा आनुवंशिक आजार आहे. ज्यात शरीरात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव वाढतो. एखाद्या व्यक्तीला जर हिमोफेलिया हा आजार झाला असेल तर इजा झालेल्या भागात अंतर्गत रक्तस्त्राव होतो. त्यातून त्या भागाला सूज येते. विशेषतः सांध्यांमध्ये रक्तस्त्राव होऊन कायमचे अपंगत्व येते. पण, अनेकदा हा आजार दूर्लक्षित राहिल्याने किंवा या विषयी जनजागृती नसल्याने ऐंशी टक्के लोकांना या आजाराबाबतची माहितीच नसते. राज्यात जवळपास साडेचार हजारांहून अधिक रुग्ण हेमोफेलियाग्रस्त आहेत.

हेही वाचा: कोरोना सेंटरमधून आजीबाई गायब..आणि केळीच्या बागेत सापडल्या

देशात एकवीस हजारावर रुग्ण

हेमोफेलिया रुग्णांना रक्तस्त्राव जास्त प्रमाणात होऊ नये यासाठी शरीरात फॅक्टर घ्यावं लागतं. पण या फॅक्टरची किंमत जवळपास 20 हजारपर्यंत आहे. हे परवडणारे नाही. धुळे हेमोफेलिया संस्थेचे सचिव स्वप्नील पाटील यांनी सांगितले, हेमोफेलियावर देशात 92 संस्था काम करतात. 20 हजार 500 रुग्ण आहेत. राज्यात साडेचार हजार रुग्ण आहेत. धुळे हिमोफिलिया सोसायटी मध्ये दोनशेपेक्षा अधिक रुग्ण नोंदणीकृत आहेत.

हेही वाचा: निर्यातदार कंपन्यांना रेमडेसिव्हिर वितरणास मान्यता

धुळे हेमोफिलिया सोसायटीची धडपड

18 ऑगस्ट 2000 मध्ये सोसायटीची स्थापना करण्यात आली. लोकांमध्ये हिमोफिलिया विषयी जागरूकता निर्माण करणे आणि रुग्णांना उपचारासाठी फॅक्टरचै इंजेक्शन उपलब्ध करून देणे. हे सोसायटी चे काम आहे. रुग्णांना लागणारे फॅक्टर च्या इंजेक्शनची किंमत 10 ते 15 हजार इतकी आहे. हा खर्च परवडणारा नाही. आता हे धुळे शहरातच मोफत मिळणार आहे. सोसायटीचे सचिव पाटील यांच्या प्रयत्नांतून शहरात केंद्र सुरु झाले आहे.धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यातील हेमोफेलियाग्रस्तांनी डाॅ. दीपक खोरे यांच्या संतोषी माता मंदिराजवळील विजयदीप हॉस्पिटलमध्ये संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. हिमोफिलिया उपचार केंद्र सुरू करण्यासाठी हिमोफिलिया फेडरेशन ऑफ इंडिया फेडरेशनचे वैद्यकीय उपाध्यक्ष डॉ. शशिकांत आपटे यांनी मान्यता दिली आहे. तर डाॅ. खोरे यांनी रुग्णांची सोय केल्याने सोसायटीतर्फे त्यांचा आज सन्मान करण्यात आला.

संपादन- भूषण श्रीखंडे