शिक्षक पती-पत्‍नीचे निवृत्तीनंतर धाडस; पासष्टीच्या वयात त्यांनी ‘कळसूबाई’चे शिखर केले सर 

जगन्नाथ पाटील   
Tuesday, 9 February 2021

निवृत्त केंद्रप्रमुख पाटील दांपत्य योगाची जोपासना करीत आहे. त्यांनी पासष्टीत कळसूबाई शिखर चार तासांत सर केले.

कापडणे : शिक्षक हे निवृत्तीअगोदरचे काही महिने एकेक करीत बोटावर दिवस मोजत असतात. नंतर निवांत जीवन जगतात. पण काही शिक्षक निवृत्तीनंतरही त्यांची उपक्रमशीलता जोपासत असतात. येथील निवृत्त केंद्रप्रमुख पाटील दांपत्य योगाची जोपासना करीत आहे. त्यांनी पासष्टीत कळसूबाई शिखर चार तासांत सर केले. पाटील दांपत्याने विविध अनुभव सांगतानाच पुन्हा एकदा शिखर सर करण्याचा निर्धार केला आहे. 

आवश्यक वाचा-  काळी हळद देण्याच्या बहाण्याने बोलावले; आणि दोघांना लाखात लुबाडले 
 

राज्यात कळसूबाई हा नगर जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर असलेला पर्वत. उत्तरेकडील सह्याद्री पर्वतरांगेतील कळसूबाई शिखराची उंची एक हजार ६४६ मीटर आहे. हे सर्वप्रथम राज्यातील एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते. कळसूबाई शिखर नगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आहे. 

पाटील दांपत्याचे उपक्रम

धुळे जिल्ह्यातून बोटावर मोजण्याएवढ्याच लोकांनी कळसूबाई शिखर सर केले आहे. येथील निवृत्त केंद्रप्रमुख दिनकर पाटील व सुनंदाबाई पाटील हे पासष्टी पार केलेले. सायंकाळ झाल्याने वरीलच निवासी तंबूत मुक्काम ठोकला. ‘सकाळ’चा सर्वोदय शिखरावरच पाहिला. पाटील दांपत्याने शिक्षक म्हणून असंख्य उपक्रम राबविले. विद्यार्थ्यांना घडविले आहे. निवृत्तीनंतरही मोफत योगवर्ग चालवीत आहेत. 

शिखर सर केल्यानंतर मोठे समाधान लाभले. वरती चढताना सारेच युवक अचंबित होत होते. आम्हीही पुढच्या वेळेस आमच्या मातापित्यांना आणू, असे निश्चयपूर्वक सांगत होते. शिखरावर सूर्योदय न्याहाळणे हा अविस्मरणीय क्षण आहे. 
-दिनकर व सुनंदाबाई पाटील, निवृत्त केंद्रप्रमुख, कापडणे, ता. धुळे 
 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news kapadne retired teacher couple kalsubai climbed peak